७८ वर्षीय अभिनेत्री अरुणा ईराणींना व्हिलचेअर पाहून हैराण झाले चाहते, व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 16:10 IST2025-02-26T16:09:39+5:302025-02-26T16:10:14+5:30

Aruna Irani : बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी दोन आठवड्यांपूर्वी बँकॉकमध्ये पडून गंभीर जखमी झाल्या होत्या. उपचारानंतर त्या मुंबई विमानतळावर स्पॉट झाल्या.

Aruna Irani Comes On Wheelchair with crutches after injury video goes viral | ७८ वर्षीय अभिनेत्री अरुणा ईराणींना व्हिलचेअर पाहून हैराण झाले चाहते, व्हिडीओ होतोय व्हायरल

७८ वर्षीय अभिनेत्री अरुणा ईराणींना व्हिलचेअर पाहून हैराण झाले चाहते, व्हिडीओ होतोय व्हायरल

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी (Aruna Irani) दोन आठवड्यांपूर्वी बँकॉकमध्ये पडून गंभीर जखमी झाल्या होत्या. उपचारानंतर त्या मुंबई विमानतळावर स्पॉट झाल्या. तिथले त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. यात त्या व्हिलचेअरवर दिसत आहेत. त्यांची अवस्था पाहून चाहते हैराण झाले आहेत. 

अरुणा ईराणींचा सोशल मीडियावर व्हिडीओ पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये त्या व्हीलचेअरवर बसलेल्या दिसते आहेत आणि एका हातात हॅण्ड वॉकर धरून आहेत. व्हिलचेअरवर बसलेल्या अभिनेत्रीच्या तोंडावर मास्क आणि हातावर पट्टी बांधलेली दिसत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये 'अरुणा इराणी सुमारे दोन आठवड्यांपूर्वी बँकॉकमध्ये पडल्या होत्या.' असे लिहिण्यात आले आहे. त्यांनी पुढे लिहिले की, 'उपचारानंतर अभिनेत्री व्हीलचेअरवर बसून हॅण्ड वॉकर घेऊन आल्या आहेत. थोडी विश्रांती घेऊन त्या भारतात परतल्या आहेत. त्यांना खूप वेदना होत होत्या पण आता मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्या हळूहळू बऱ्या होत आहेत. अरुणा इराणी यांनी अपघाताबाबत अद्याप काहीही सांगितलेले नाही.


इतकी दुखापत झालेली असतानाही या व्हिडिओमध्ये अरुणा ईराणी 'चलती का नाम गाडी' चित्रपटातील 'हाल कैसा है जनाब का' हे प्रसिद्ध गाणे गाताना दिसत आहे. हे गाणे किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायले होते. त्यांची तब्येत ठीक नाही पण त्या पूर्ण उत्साहाने गाणे गुणगुणत आहे.

वर्कफ्रंट

अभिनेत्री अरुणा ईराणी यांनी हिंदी, कन्नड, मराठी आणि गुजराती सिनेमांमध्ये ५०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांना अभ्यासाची खूप आवड होती आणि त्यांना डॉक्टर व्हायचे होते. मात्र, आर्थिक अडचणींमुळे त्यांचे कुटुंब त्यांच्या सर्व मुलांना शिक्षण देऊ शकले नाही आणि सहावीनंतर त्यांना शाळा सोडावी लागली. १९६१ मध्ये रिलीज झालेल्या 'गंगा जमुना' या चित्रपटात त्यांनी बाल कलाकाराची भूमिका साकारली होती. यानंतर त्या 'अनपढ'मध्ये दिसल्या, ज्यामध्ये त्यांनी माला सिन्हा यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती.

Web Title: Aruna Irani Comes On Wheelchair with crutches after injury video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.