बॉलिवूडनंतर अर्स्लान गोनी करतोय या क्षेत्रात पदार्पण, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2020 07:15 IST2020-02-16T07:15:00+5:302020-02-16T07:15:00+5:30

मुळचा जम्मू काश्मीरचा असलेला अभिनेता अर्स्लान गोनीने २०१७ साली जिया और जिया या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

Arslan Goni is making his debut in webseries after Bollywood, read the details | बॉलिवूडनंतर अर्स्लान गोनी करतोय या क्षेत्रात पदार्पण, वाचा सविस्तर

बॉलिवूडनंतर अर्स्लान गोनी करतोय या क्षेत्रात पदार्पण, वाचा सविस्तर

 
मुळचा जम्मू काश्मीरचा असलेला अभिनेता अर्स्लान वेबसीरिजच्या माध्यमातून डिजिटल क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो ऑल्ट बालाजीची आगामी वेबसीरिज 'मैं हिरो बोल रहा हूं'मध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ही सीरिज ८०-९०च्या काळातील गुंड्यांवर आधारीत आहे.

अर्स्लान 'में हिरो बोल रहा हूं' नंतर 'हक से 2' या वेबसीरिजमध्येही काम करताना दिसणार आहे. २०१७ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर अर्स्लान दोन वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. याबद्दल तो म्हणतो की, चित्रपट असो किंवा शॉर्टफिल्म.. कथा सांगण्यासारखी मजेशीर व लक्ष वेधून घेणारी असली पाहिजे.


अर्स्लान पुढे म्हणाला की, मी कथा प्रेमी आहे आणि मला प्रभावित करणाऱ्या गोष्टी करायला जास्त आवडतात. ऑल्ट बालाजीची वेबसीरिज मैं हिरो बोल रहा हूची स्क्रीप्ट मला खूप भावली आणि मी काम करायला होकार दिला. या सीरिजमध्ये काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. प्रेक्षकांनादेखील ही वेबसीरिज खूप आवडेल, अशी मला आशा आहे. प्रेक्षकांसमोर माझे कलागुण दाखवण्याची ही माझ्यासाठी चांगली संधी आहे. सेटवर काम करणे आणि कॅमेरासमोर रोमान्स करणे, हीच एक वेळ आहे जिथे मी स्वतःला सिद्ध करून शकतो.


अर्स्लान गोनीच्या वेबसीरिजला प्रेक्षकांचा रिस्पॉन्स कसा मिळतो हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

Web Title: Arslan Goni is making his debut in webseries after Bollywood, read the details