पाहा,अर्पिता खानच्या मुलीची पहिली झलक, मामू सलमानसोबतचा पहिला फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 15:46 IST2019-12-29T14:52:14+5:302019-12-29T15:46:08+5:30
बहिण अर्पिता खान हिने सलमानच्या वाढदिवसाच्या दिवशीच म्हणजे 27 डिसेंबरला एका गोंडस मुलीला जन्म दिला.

पाहा,अर्पिता खानच्या मुलीची पहिली झलक, मामू सलमानसोबतचा पहिला फोटो व्हायरल
सलमान खानला त्याच्या वाढदिवशी सर्वात मोठे गिफ्ट मिळाले. होय, बहिण अर्पिता खान हिने सलमानच्या वाढदिवसाच्या दिवशीच म्हणजे 27 डिसेंबरला एका गोंडस मुलीला जन्म दिला. सलमानच्याच वाढदिवसाच्या मुहूर्तावर अगदी ठरवून तिने सी सेक्शनद्वारे आपल्या गोंडस मुलीला जन्म दिला. आता अर्पिताच्या मुलीचा पहिला फोटो समोर आला आहे.
होय, अर्पिताने आपल्या मुलीचे नाव आयत ठेवले आहे. आयतचा पहिला फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो आहे. यात मामू सलमान खान आयतच्या गोड पापा घेताना दिसतोय.
आयतच्या जन्मानंतर सलमान तिचा व अर्पिताला भेटायला रूग्णालयात पोहोचला होता. तेव्हाचे हे छायाचित्र आहे.
आयत ही मला अर्पिताने दिलेले वाढदिवसाचे सर्वात मोठे गिफ्ट आहे, असे सालमान म्हणाला होता. अर्पिताच्या प्रसूतीवेळी संपूर्ण खान कुटुंब रुग्णालयात उपस्थित होते. खुद्द अर्पिताने मुलीला जन्म दिल्याची गूड न्यूज शेअर करत मुलीचेनावही सांगितले होते.
अर्पिता खान शर्माचे हे दुसरे अपत्य आहे. 18 नोव्हेंबर 2014 मध्ये अर्पिताने तिच्यापेक्षा एक वर्ष लहान बॉयफ्रेन्ड आयुष शमार्सोबत लग्न केले. आयुष हा हिमाचल प्रदेशातील सर्वाधिक प्रतिष्ठित राजकीय घराण्याचा वारसदार आहे. अर्पिता आणि आयुष यांना आहिल नावाचा एक मुलगा आहे. मुळात सलमान खान बहीण अर्पिता खानवर जितके प्रेम करतो, त्याच्या कैकपट प्रेम अहिलवर करतो. मामा-भाच्याच्या जोडीचे प्रेम चाहत्यांनी अनेकदा पाहिले आहे. त्यामुळे आता अहिलनंतर मामा सलमानचे अर्पिताच्या मुलीचे बॉन्डींग कसे बनणार हे ही पाहणे रंजक असणार आहे.