अरनॉल्डचा सौदा फिसकटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 14:36 IST2016-01-16T01:09:20+5:302016-02-05T14:36:17+5:30
सुरपस्टार रजनीकांतच्या बहुचर्चित 'इथिरन - २' या चित्रपटात हॉलिवूडचा सुपरस्टार अरनॉल्ड शॉत्झनेगर काम करणार होता. मात्र, मानधनावरून हा सौदा ...

अरनॉल्डचा सौदा फिसकटला
स रपस्टार रजनीकांतच्या बहुचर्चित 'इथिरन - २' या चित्रपटात हॉलिवूडचा सुपरस्टार अरनॉल्ड शॉत्झनेगर काम करणार होता. मात्र, मानधनावरून हा सौदा फिसकटला आहे. रजनीकांतने बुधवारी चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरूवात केली आहे. व्हिलनच्या भूमिकेत काम करण्यासाठी तब्बल १२0 कोटी रुपयांची मागणी त्याने केली होती, असे समजते. त्याऐवजी बॉलिवूडमधीलच कलावंत या चिटपटात असेल. अरनॉल्ड चित्रपटात असता, तर त्याचे व्यस्त वेळापत्रक पाहता चित्रपटासही उशीर झाला असता. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्री अँमी जॉक्सन मात्र निश्चितपणे काम करीत आहे. ती 'रोबोट'च्या भूमिकेत असेल. लायका प्रॉडक्शनतर्फे तयार होणार्या या चित्रपटाचा शंकर दिग्दर्शक आहे.