डॅडीविनाच होणार अर्जुन रामपालच्या 'डॅडी'चा प्रीमिअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 10:24 IST2017-09-02T04:42:38+5:302017-09-02T10:24:10+5:30

अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळीच्या जीवनावर आधारित डॅडी चित्रपट याच आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अर्जुन रामपाल या चित्रपट डॅडीची ...

Arjun Rampal's 'Daddy' premiere will be done without DDVINA | डॅडीविनाच होणार अर्जुन रामपालच्या 'डॅडी'चा प्रीमिअर

डॅडीविनाच होणार अर्जुन रामपालच्या 'डॅडी'चा प्रीमिअर

डरवर्ल्ड डॉन अरूण गवळीच्या जीवनावर आधारित डॅडी चित्रपट याच आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अर्जुन रामपाल या चित्रपट डॅडीची भूमिका साकारणार आहे. सध्या तो डॅडीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याचित्रपटाच्या मेकर्सने अरुण गवळीसाठी एका स्पेशल स्क्रीनिंगचे प्लानिंग केले होते. मात्र आता असे वाटतेय की अर्जुन रामपाल आणि त्यांच्या टीमचे सगळे प्रयत्न वाया जाणार आहेत.    

आधी हा चित्रपट 21 जुलैला रिलीज करण्यात येणार होता. मात्र अरुण गवळीची मुलगी गीता गवळीने चित्रपटाच्या मेकर्सना विनंती केली चित्रपटाची रिलीज टेड 21 जुलैऐवजी 8 सप्टेंबर करायला सांगितली होती. गीताचे म्हणणे होते अरुण गवळींनीसुद्धा हा चित्रपट पहावा म्हणून पॅरोल अर्ज दाखल केला होता मात्र त्याचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. 
रिपोर्टनुसार गणपतीच्या सणानिमित्त अरुण गवळीने पॅरोलचा अर्ज दाखल केला होता. त्याचवेळी तो बाहेर येऊन चित्रपटसुद्धा बघणार होता. मात्र त्याचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे गीता म्हणाली अरुण गवळी हे नाही चित्रपटाच्या स्क्रिनिंगला उपस्थित राहु शकत नाही चित्रपट बघू शकत.  

'डॅडी’ या चित्रपटाचे सहलेखक आणि दिग्दर्शन अशीम अहलुवालिया यांनी केले आहे. ७० च्या दशकात अरुण गवळी अंडरवर्ल्डच्या विळख्यात कसे येतात, पुढे दगडी चाळीत त्यांची गॅँग कशी तयार होते अन् त्यानंतर राजकारणात कसे डावपेच आखले जातात याबाबतची कथा ट्रेलरमधून दिसून येत आहे. अर्जुन रामपालविषयी बोलायचे झाल्यास, त्याने बºयाच अंशी अरुण गवळी यांच्या भूमिकेला न्याय दिल्याचे दिसून येत आहे. 

Web Title: Arjun Rampal's 'Daddy' premiere will be done without DDVINA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.