अर्जुन कपूरचे ‘टेरेस जिम’ यामुळे होणार जमिनदोस्त!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2016 12:18 IST2016-12-29T12:18:53+5:302016-12-29T12:18:53+5:30
अभिनेता अर्जुन कपूर सध्या चर्चेत आहे तो मलायका अरोरा (सलमानची वहीणी आणि अरबाज खान याची एक्स वाईफ) हिच्यासोबतच्या वाढत्या ...
.jpg)
अर्जुन कपूरचे ‘टेरेस जिम’ यामुळे होणार जमिनदोस्त!!
अ िनेता अर्जुन कपूर सध्या चर्चेत आहे तो मलायका अरोरा (सलमानची वहीणी आणि अरबाज खान याची एक्स वाईफ) हिच्यासोबतच्या वाढत्या मैत्रीमुळे. अर्जुन आणि मलायकाच्या मैत्रीमुळे सलमान नाराज आहे आणि यामुळे अर्जुनचे करिअर सध्या अडचणीत आलेयं, ही बातमी काल-परवाच आम्ही तुम्हाला दिली. आता अर्जुन आणखी एका अडचणीत सापडलाय. या मागचे कारण आहे, अर्जुनचे टेरेस जिम. होय, जुहू येथील राहत्या घराच्या टेरेसवर अर्जुनने विनापरवानगी जिम उभारले होते. हे बांधकाम अवैध ठरवत बृहन्मुंबई महानगरपालिकेने अर्जुनला नोटीस पाठवले आहे.
घराच्या गच्चीवरील ३०१६ फुट जागेवर अर्जुनने अद्यावत जिम उभारले होते. हे बांधकाम अवैध असून अतिक्रमण असल्याचे या नोटीसमध्ये म्हटले आहे. यासंदर्भात अर्जुन वा त्याच्या मॅनेजरशी संपर्क साधला असता त्यांनी कुठलेही उत्तर दिले नाही.
{{{{twitter_post_id####
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुनच्या बिल्डिंगमधील कुठल्याही रहिवाशाने याबद्दल तक्रार नोंदवलेली नाही. तर एका कार्यकर्त्याने याबद्दल तक्रार नोंदवली. यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने त्वरित कारवाई करत, अर्जुनला हे नोटीस जारी केले. खरे तर याआधीही मार्चमध्ये याप्रकरणी अर्जुनला नोटीस जारी करण्यात आले होते. टेरेस जिमबद्दलचे सर्व कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश याद्वारे अर्जुनला देण्यात आले होते. यानंतर अर्जुनच्या मॅनेजरने हे अवैध बांधकाम वैध करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही मुदत देण्याची विनंती केली होती. त्यानुसार अर्जुनला काही महिन्यांची मुदत दिली गेली. पण यादरम्यान त्याच्याकडून कुठल्याही कागदपत्रांची पूर्तता झाली नाही. हे पाहून महापालिकेने त्याला दुसरे नोटीस जारी केले. सूत्रांचे मानाल तर आता महापालिकेने कडक धोरण अवलंबत अर्जुनचे हे जिम जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांत अर्जुनचे हे टेरेस जिम जमिनदोस्त होण्याची शक्यता आहे.

}}}}Mumbai: Brihanmumbai Municipal Corporation issues notice to Actor Arjun Kapoor over illegal construction at his Juhu residence. pic.twitter.com/QgVel6ZMq4— ANI (@ANI_news) December 29, 2016