अर्जुन कपूरच्या ह्या चित्रपटात नसणार एकही अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 07:30 IST2018-08-24T16:01:08+5:302018-08-25T07:30:00+5:30
'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' ही एक क्राईम स्टोरी असणार आहे. या चित्रपट एका सिक्रेट मिशनवर भाष्य करताना दिसणार आहे. या सिक्रेट मिशनमध्ये ते दहशतवाद्यांना शोधताना व त्यांच्यावर कारवाई करताना दिसणार आहेत.

अर्जुन कपूरच्या ह्या चित्रपटात नसणार एकही अभिनेत्री
बॉलिवूडचा 'इश्कजादे' अभिनेता अर्जुन कपूरने 'इश्कजादे' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याचे या सिनेमातील काम प्रेक्षकांना भावले. कमी कालावधीतच त्याने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. सध्या त्याच्याकडे बरेच सिनेमे आहेत. त्यातील एक सिनेमा आहे 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड'. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार गुप्ता करत आहेत.
'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' ही एक क्राईम स्टोरी असणार आहे. या चित्रपट एका सिक्रेट मिशनवर भाष्य करताना दिसणार आहे. या सिक्रेट मिशनमध्ये ते दहशतवाद्यांना शोधताना व त्यांच्यावर कारवाई करताना दिसणार आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार या चित्रपटात अभिनेत्रींबाबतची बाब विशेष आहे. कारण या सिनेमामध्ये एकही अभिनेत्री असणार नाही. हा सिनेमा गुन्ह्याच्या तपासावर आधारलेला आहे. अर्जुन कपूर एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला अर्जुनने सुरूवात केली आहे. या सिनेमाचे चित्रीकरण नेपाळ व दिल्लीत पार पडणार आहे.
सिनेमा वास्तवाच्या अधिकाधिक जवळ असायला हवा, अशीच दिग्दर्शकाची अपेक्षा आहे. त्याचसाठी त्यामध्ये कोणीही हिरोईन असणार नाही. अगदी वास्तविक वाटावा, असाच रोल असल्याने अर्जुनही या रोलबाबत खूश आहे. मात्र, सिनेमामध्ये एकही हिरोईन असणार नाही. एवढेच नव्हे, तर एकही अभिनेत्री किंवा फिमेल कॅरेक्टरही असणार नाही, म्हणून तो थोडासा नर्व्हसदेखील झाला आहे.
'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' हा सिनेमा पुढील वर्षी 24 मे रोजी रिलीज होणार आहे. अर्जुन कपूरला अभिनेत्रीशिवाय सिनेमात पाहणे कमालीचे ठरणार आहे.