'फोटोज तो खराब है...", Arjun Kapoor ने Anushka Sharma च्या लेटेस्ट फोटोवरुन केलं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 10:46 AM2022-09-24T10:46:32+5:302022-09-24T11:02:18+5:30

अर्जुन कपूरने पुन्हा एकदा अनुष्काला ट्रोल केलं आहे. अनुष्काच्या लेटेस्ट पोस्टवर पाहून रणवीर सिंगलाही हसू आवरता आलं नाही.

Arjun kapoor trolls Anushka Sharma Ranveer Singh react bollywood actress | 'फोटोज तो खराब है...", Arjun Kapoor ने Anushka Sharma च्या लेटेस्ट फोटोवरुन केलं ट्रोल

'फोटोज तो खराब है...", Arjun Kapoor ने Anushka Sharma च्या लेटेस्ट फोटोवरुन केलं ट्रोल

Arjun Kapoor Trolls Anushka Sharma: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा(Anushka Sharma) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अनुष्काच्या शर्मा आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor)  दोघेही सोशल मीडियावर एकमेकांच्या फोटोंवर मजेशीर कमेंट करत असतात. अर्जुन कपूरने पुन्हा एकदा अनुष्काला ट्रोल केलं आहे. अनुष्काच्या लेटेस्ट पोस्टवर पाहून रणवीर सिंगलाही हसू आवरता आलं नाही. अनुष्काने नुकतेच ओव्हरसाईज हुडीमधले फोटो शेअर केले आहेत. हे फोटो स्वतः अनुष्काला आवडले नाहीत.  आता अर्जुन कपूरने यावर खिल्ली उडवली आहे.

फोटोंमध्ये अनुष्काने ओव्हरसाईज हुडी आणि ब्लक कलरची पँट घातलेली दिसत आहे. यासोबतच तिनं मॅचिंग शूज ही घातले आहेत. फोटो शेअर करताना अनुष्काने लिहिले - मला एकही फोटो आवडला नाही. म्हणून मला वाटले की नेहमी चांगला फोटो टाकावा, असे कोण म्हणाले? तर हे माझे ok ok टाईपचे फोटो आहेत.
 
अर्जुन कपूरनं केलं ट्रोल 
अर्जुन कपूरने अनुष्का शर्माच्या पोस्टवर कमेंट केली आहे. अर्जुनने लिहिले - हुडी चांगली आहे, फोटो खराब आहेत, मी देखील सहमत आहे. रणवीर सिंगही अनुष्काच्या फोटोंवर हसणार इमोजी पोस्ट केले आहेत. अनुष्काची ही पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत.

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, अनुष्का सध्या तिच्या आगामी 'चकडा एक्सप्रेस' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.  हा चित्रपट क्रिकेटर झुलन गोस्वामीचा बायोपिक आहे. अनुष्का शेवटची 2018 मध्ये शाहरुख खान आणि कतरिना कैफ सोबत झिरो चित्रपटात दिसली होती.


 

Web Title: Arjun kapoor trolls Anushka Sharma Ranveer Singh react bollywood actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.