OMG! अर्जुन कपूरची बहिण अंशुला झाली फॅट टू फिट, मॅजिकल ट्रान्सफॉर्मेशन पाहून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 16:41 IST2022-02-27T16:40:42+5:302022-02-27T16:41:27+5:30

Anshula Kapoor : अंशुलाने नुकतेच सोशल मीडियावर आपले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमुळे सध्या ती चांगलीच चर्चेत आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अंशुलाची फॅट टू फिट (Fat to fit) फिगर.

arjun kapoor sister anshula kapoor weight loss transformation fat to fit look | OMG! अर्जुन कपूरची बहिण अंशुला झाली फॅट टू फिट, मॅजिकल ट्रान्सफॉर्मेशन पाहून थक्क व्हाल

OMG! अर्जुन कपूरची बहिण अंशुला झाली फॅट टू फिट, मॅजिकल ट्रान्सफॉर्मेशन पाहून थक्क व्हाल

अंशुला कपूर (Anshula Kapoor) फिल्म इंडस्ट्रीत अ‍ॅक्टिव्ह नाही. पण तरीही ती फिल्म इंडस्ट्रीचा ओळखीचा चेहरा आहे. होय, बॉलिवूड चित्रपटांत सक्रीय नसूनही लोकप्रिय असलेल्या स्टार किड्सच्या यादीत तिचं नाव आघाडीवर आहे. बोनी कपूरची लेक आणि अर्जुन कपूरची (Arjun Kapoor) बहिण अंशुला आत्तापर्यंत अ‍ॅक्टिंगपासून दूर राहिली. पण कदाचित आता तिलाही अ‍ॅक्टिंगची दुनिया खुणावू लागली आहे. होय, तिचे ताजे फोटो पाहून तरी हेच वाटतंय.
होय, अंशुलाने तिचे काही ताजे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत आणि ते पाहून चाहते थक्क झाले आहेत. कारण आहे अंशुलाचा फॅट टू फिट अवतार.

होय, अर्जुनची लाडकी बहिणी चांगलीच फिट झाली आहे. तिच्या ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो पाहून अनेकांना आश्चर्यचा धक्का बसला आहे. 
अंशुलाने एक मिरर सेल्फी शेअर केला आहे. यात ती आधीपेक्षा प्रचंड वेगळी दिसतेय. तिने वजन कमी केल्याचं दिसतेय. तिचा हा फॅट टू फिट लूक पाहून अनेक सेलिब्रिटींनीही तिचं कौतुक केलं आहे. यात कतरिना कैफ हिचाही समावेश आहे. काका संजय कपूर यांनीही तिचं कौतुक केलं आहे.

अर्जुनची लेडी ऑफ लाईफ
अंशुला अनेकदा अर्जुन कपूरसोबत दिसते. अर्जुन व अंशुला यांच्यात खूप चांगलं बॉन्डिंग आहे. मी माझ्या बहिणीच्या सगळ्यांत जवळ आहे. ती माझी ‘लेडी ऑफ लाईफ’ आहे,असं अर्जुन तिच्याबद्दल एका मुलाखतीत म्हणाला होता. अर्जुन अंशुलाप्रति कमालीचा प्रोटेक्टिव्ह आहे. अनेकप्रसंगी त्याने हे दाखवून दिले आहे. आईच्या मृत्यूनंतर अर्जुन व अंशुला या दोघांनी एकमेकांना सांभाळले. याचकाळात अंशुला अर्जुनची जणू आई बनली.

मलायकाला मिळतंय श्रेय
अंशुला कपूरचा हा नवा अवतार पाहून अनेक चाहत्यांनी मलायका अरोराला श्रेय दिलं आहे. होय, मलायका ही अंशुलाची होणारी वहिनी. मलायकाचे फिटनेस प्रेम तर तुम्हाला ठाऊक आहेच. त्यामुळे होणाऱ्या वहिनीपासून प्रेरणा घेत नणंदबाईने फिटनेसवर लक्ष केंद्रीत केल्याचं चाहत्यांचं मत आहे.

Web Title: arjun kapoor sister anshula kapoor weight loss transformation fat to fit look