Anshula Kapoor : अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला रोमॅन्टिक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 15:32 IST2023-03-28T15:31:52+5:302023-03-28T15:32:40+5:30

Anshula Kapoor, Arjun Kapoor : अर्जुन कपूर मलायका अरोराच्या प्रेमात आहे आणि आता अशुंला ही सुद्धा प्रेमात पडलीये....

Arjun Kapoor Sister Anshula Kapoor Date Screen Writer Rohan Thakkar Share Romantic Photo | Anshula Kapoor : अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला रोमॅन्टिक फोटो

Anshula Kapoor : अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला रोमॅन्टिक फोटो

अंशुला कपूर (Anshula Kapoor) फिल्म इंडस्ट्रीत अ‍ॅक्टिव्ह नाही. पण तरीही ती फिल्म इंडस्ट्रीचा ओळखीचा चेहरा आहे. होय, बॉलिवूड चित्रपटांत सक्रीय नसूनही लोकप्रिय असलेल्या स्टार किड्सच्या यादीत तिचं नाव आघाडीवर आहे. बोनी कपूरची लेक आणि अर्जुन कपूरची (Arjun Kapoor) बहिण अंशुला सध्या एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आली आहे. होय, अंशुला तिच्या लव्हलाईफमुळे चर्चेत आहे. अर्जुन कपूर मलायका अरोराच्या प्रेमात आहे आणि आता अशुंला ही सुद्धा प्रेमात पडलीये.

आता अंशुलाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर खास फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली आहे. तिने बॉयफ्रेंडसह फोटो शेअर केला आहे. अंशुला सध्या रोहन ठक्करला डेट करतेय. रोहन हा एक लेखक आहे. दोघंही सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशन साजरं करताहेत. याचदरम्यानचा एक क्लोजी फोटो अंशुलाने शेअर केला आहे.

अंशुलाच्या या फोटोवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स केल्या आहेत. अंशुलाची सावत्र बहीण जान्हवी कपूर, चुलत बहीण रिया कपूर, महिप कपूर, अथिया शेट्टी आदींनी तिच्या फोटोवर कमेंट्स करत प्रेम व्यक्त केलं आहे.

अर्जुन आपल्या धाकट्या बहिणीवर प्रचंड प्रेम करतो. अगदी अंशुला त्याचा जीव की प्राण आहे. ‘ मी माझ्या बहिणीच्या सगळ्यांत जवळ आहे. ती माझी लेडी ऑफ लाईफ आहे,असं अर्जुन तिच्याबद्दल एका मुलाखतीत म्हणाला होता. अर्जुन अंशुलाप्रति कमालीचा प्रोटेक्टिव्ह आहे. अनेकप्रसंगी त्याने हे दाखवून दिले आहे. आईच्या मृत्यूनंतर अर्जुन व अंशुला या दोघांनी एकमेकांना सांभाळलं. याकाळा अंशुला अर्जुनची जणू आई बनली होती. लाकार मंडळींबरोबरच त्यांच्या कुटुंबातील मंडळीही कायमच चर्चेत असतात. काही कलाकार आपल्या कुटुंबियांना झगमगत्या दुनियेपासून दूर ठेवतात. तर काही कलाकारांच्या कुटुंबातील मंडळीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. असंच काहीसं अर्जून कपूरची बहीण अंशुला कपूरच्या बाबतीतही आहे. अंशुला अभिनयक्षेत्रापासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. 

Web Title: Arjun Kapoor Sister Anshula Kapoor Date Screen Writer Rohan Thakkar Share Romantic Photo