मलायकाला बर्थडे विश केलं नाही, आता क्रिप्टिक पोस्ट शेअर करत अर्जून कपूर म्हणतो- "तुम्ही कोण आहात..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 11:05 IST2024-10-25T11:02:52+5:302024-10-25T11:05:24+5:30

मलायकाच्या वाढदिवशी अर्जुन कपूरने कोणतीही पोस्ट केली नव्हती. पण, तिच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी मात्र अर्जून एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.

arjun kapoor shared criptic post after malaika arora birthday goes viral | मलायकाला बर्थडे विश केलं नाही, आता क्रिप्टिक पोस्ट शेअर करत अर्जून कपूर म्हणतो- "तुम्ही कोण आहात..."

मलायकाला बर्थडे विश केलं नाही, आता क्रिप्टिक पोस्ट शेअर करत अर्जून कपूर म्हणतो- "तुम्ही कोण आहात..."

मलायका अरोरा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. बॉलिवूडच्या या आयटम गर्लने अनेक गाण्यांमध्ये तिचा जलवा दाखवला आहे. वयाची पन्नाशी गाठलेली मलायका चाहत्यांना घायाळ करते. अभिनयाबरोबरच मलायका तिच्या फिटनेसमुळेही चर्चेत असते. अभिनेत्रीचा फिटनेस भल्याभल्यांना लाजवेल असाच आहे. नुकतंच मलायकाने तिचा ५१वा वाढदिवस साजरा केला. मलायकाचा एक्स बॉयफ्रेंड असलेल्या अर्जुन कपूरने तिला वाढदिवशी विश केलं नाही. 

मलायकाच्या वाढदिवशी अर्जुन कपूरने कोणतीही पोस्ट केली नव्हती. पण, तिच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी मात्र अर्जून एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. ज्या पोस्टची सर्वत्र चर्चा रंगली आहे. अर्जुनने या पोस्टमध्ये "तुम्ही कोण आहात हे कधीही विसरू नका - द लायन किंग", असं म्हटलं आहे. अर्जुनची ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. 

अर्जुन-मलायका ब्रेकअप

अर्जुन कपूर आणि मलायका हे गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. सोशल मीडियावर फोटो शेअर करत ते एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करताना दिसायचे. मलायका आणि अर्जुन हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल होते. पण, काहीच महिन्यांपूर्वी त्यांनी ब्रेकअप झाल्याचं जाहीर केलं होतं. 

मलायका-अरबाज घटस्फोट

मलायकाने १९९८ साली अरबाज खानशी लग्न केलं होतं. जवळपास १९ वर्षांच्या सुखी संसारानंतर मलायका आणि अरबाज घटस्फोट घेत एकमेकांपासून वेगळे झाले. त्यांना अरहान हा मुलगा आहे. अरबाजशी घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अर्जुनबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. तर अरबाजने गेल्याच वर्षी शूरा खानशी निकाह करत पुन्हा नव्या आयुष्याला सुरुवात केली. 
 

Web Title: arjun kapoor shared criptic post after malaika arora birthday goes viral