Confirm! अर्जुन कपूरनं कबूल केलं मलायकासोबतचे नातं, असा आहे त्यांच्या लग्नाचा प्लॉन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 11:38 IST2019-07-06T11:24:29+5:302019-07-06T11:38:49+5:30
अर्जुन कपूर आणि मलायका अरोराने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. अर्जुन कपूरच्या बर्थ डेच्या दिवशी मलाकाने त्यांचे रिलेशनशीप ऑफिशियल केले.

Confirm! अर्जुन कपूरनं कबूल केलं मलायकासोबतचे नातं, असा आहे त्यांच्या लग्नाचा प्लॉन
अर्जुन कपूर आणि मलायका अरोराने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. अर्जुन कपूरच्या बर्थ डेच्या दिवशी मलाकाने त्यांचे रिलेशनशीप ऑफिशियल केले. दोघे ही आपलं प्रेम जगजाहिर करण्याची एकही संधी सोडत नाहीत. गेल्या अनेक दिवसांपासून अर्जुन व मलायकाच्या लग्नाच्या बातम्या येत आहेत. एका मुलाखतीत दरम्यान लग्नाबाबतच्या प्लॉनचा खुलासा केला की, मला लग्नाची कुठलीही घाई नाही, असे अर्जुनने स्पष्ट केले होते. पुढे तो म्हणाला, सध्या माझा लग्नाचा कुठलाही विचार नाही. माझी पर्सनल व प्रोफेशनल लाईफ चांगली सुरु आहे.
आयुष्यात मी स्थिरावलो, असे मला वाटतेय. मी माझे खासगी आयुष्य कधीच लपवले नाही. त्यामुळे लग्नाचा बेत असेल तर तेही मी जगापासून लपवणार नाही, असे अर्जुन अलीकडे एका मुलाखतीत म्हणाला होता. मलायकासोबतच्या नात्यावरही तो बोलला होता. मी माझे नाते सामान्य ठेवू इच्छितो. कारण आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही. आम्ही काहीही लपवलेले नाही, असे त्याने सांगितले होते.
नुकताच मलायकाने ती अर्जुन कपूरला कोणत्या नावाने आवाज देत असल्याचा खुलासा सोशल मीडियावर केला होता. मलायकाने एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोत तिने आणि अर्जुनने एकच कप घातली होती. मलायकाने या फोटोला कॅप्शन दिले आहे की, 'Mad hatter in nyc (p.s THE mad hatter clicked it)'. याचा अर्थ मलायका अर्जुनला मॅड हॅटर नावाने बोलवते.