ठरलं तर मग! अर्जुन कपूरने घेतली मलायकाच्या आईची भेट, रितसर मागितला हात?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 12:44 PM2024-04-01T12:44:53+5:302024-04-01T12:45:49+5:30

मलायका अर्जुनपेक्षा १२ वर्षांनी मोठी आहे.

Arjun Kapoor met Malaika Arora s mother netizens says soon they are getting married | ठरलं तर मग! अर्जुन कपूरने घेतली मलायकाच्या आईची भेट, रितसर मागितला हात?

ठरलं तर मग! अर्जुन कपूरने घेतली मलायकाच्या आईची भेट, रितसर मागितला हात?

बॉलिवूडमध्ये नेहमी चर्चेत राहणारं कपल म्हणजे मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor). दोघंही त्यांच्यातील वयाच्या फरकामुळे कायम ट्रोल होत असतात. काल बऱ्याच दिवसांनी ही जोडी एकत्र दिसली. मधल्या काळात त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं होतं. एकत्र फिरणंही ते टाळत होते. पण काल हे हॉट कपल सोबत दिसलं तेही मलायकाच्या आईच्या घरी. होय, अर्जुन कपूर काल मलायकासोबत तिच्या आईच्या घरी पोहोचला. यावरुन दोघांच्या लग्नाच्या चर्चांना पुन्हा उधाण आलंय.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर दोघांमध्ये १२ वर्षांचं अंतर आहे.  मात्र ते एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. काल इस्टर निमित्त अर्जुन कपूर गर्लफ्रेंड मलायका अरोरासोबत तिच्या आईच्या घरी पोहोचला. तिची आई दरवर्षी ईस्टर साजरा करते. यावर्षी सुद्धा त्यांनी घरी पार्टीचं आयोजन केलं. यासाठी अर्जुन कपूर मलायकासह आला होता. काळा टीशर्ट आणि जीन्स अशा कॅज्युअल लूकमध्ये तो दिसला. तर मलायकाने ओव्हरसाईज्ड पांढरा शर्ट घातला होता.  त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

अर्जुन-मलायकाला एकत्र पाहून सोशल मीडियावर पुन्हा त्यांना ट्रोल केलं जात आहे. मलायकाला २० वर्षांचा एक मुलगा आहे. अरबाजसोबत तिचा घटस्फोट झाला आहे. आता ती १२ वर्ष लहान अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. कपलने अद्याप त्यांच्या लग्नावर काहीच भाष्य केलेलं नाही. मात्र अर्जुन मलायकाच्या आईच्या घरी आल्याने 'रिश्ता पक्का समझे क्या?' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

Web Title: Arjun Kapoor met Malaika Arora s mother netizens says soon they are getting married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.