अर्जुन कपूरच्या हातावरचा नवा टॅटू का आहे स्पेशल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 15:29 IST2019-07-29T15:12:44+5:302019-07-29T15:29:06+5:30
मलायका अरारोसोबतच्या रोमॅन्टिक रिलेशनमुळे कायम चर्चेत असणारा अर्जुन कपूर सध्या त्याच्या नव्या टॅटूमुळे चर्चेत आहे.

अर्जुन कपूरच्या हातावरचा नवा टॅटू का आहे स्पेशल?
ठळक मुद्देलवकरच तो आशुतोष गोवारीकरच्या ‘पानीपत’ या सिनेमात झळकणार आहे.
मलायका अरारोसोबतच्या रोमॅन्टिक रिलेशनमुळे कायम चर्चेत असणारा अर्जुन कपूर सध्या त्याच्या नव्या टॅटूमुळे चर्चेत आहे. अर्जुनने सोशल मीडियावर हा टॅटू आणि तो बनवणा-याचा फोटो शेअर केला आहे. हे फोटो पाहिल्यानंतर अर्जुनने मलायकाच्या नावाचा टॅटू गोंदवला, असाच अनेकांचा समज झाला. पण नाही, अर्जुनने आपल्या हातावर गोंदवलेला हा टॅटू मलायकाच्या नावाचा नाही तर वेगळाच आहे. वेगळाच नाही तर अनोखा आहे.
याआधी अर्जुनने आई मोना कपूर हिच्या आठवणीत ‘माँ’ असा टॅटू गोंदवला आहे. पण त्याचा हा नवा टॅटू कुणाच्या नावाचा वा कुणाच्याही आठवणीत काढलेला नाही. अर्जुनचा नवा टॅटू लॅटीन भाषेत आहे. ‘Per Ardua Ad Astra’ असे त्याने गोंदवले आहे. आता त्याचा अर्थ काय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर खुद्द अर्जुनने त्याचा अर्थ सांगितला आहे. याचा अर्थ होतो ‘From adversity to the stars’. हा टॅटू बनवतानाचा व्हिडीओही अर्जुनने शेअर केला आहे. जे जे कॉलेज ऑफ आर्ट्सचा पदवीधर सॅवियो डीसिल्वाने हा टॅटू बनवला आहे.
अर्जुन कपूरचे ‘नमस्ते इंग्लंड’ आणि ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ असे सलग दोन सिनेमे फ्लॉप झालेत. यानंतर येऊ घातलेला ‘संदीप और पिंकी फरार’ हा त्याचा सिनेमाही रखडला. लवकरच तो आशुतोष गोवारीकरच्या ‘पानीपत’ या सिनेमात झळकणार आहे.
पर्सनल लाईफमुळे अर्जुन सर्वाधिक चर्चेत आहे. मलायका अरोरासोबतचे त्याचे नाते आता कुणापासूनही लपून राहिलेले नाही. लवकरच तो व मलायका लग्न करणार असेही मानले जात आहे. गेल्या शनिवारी अर्जुनने मलायकाच्या आईबाबांची भेट घेतली. यावरून या लग्नाची तयारी सुरु झाल्याचे मानले जात आहे.