अर्जुन कपूर दिसणार निगेटिव्ह भूमिकेत ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 08:00 IST2018-09-28T14:01:15+5:302018-09-29T08:00:00+5:30

गेल्या काही दिवसांपासून 'एक विलन' या चित्रपटाच्या सीक्वलबाबत चर्चा रंगली आहे.

Arjun Kapoor to appear in negative role? | अर्जुन कपूर दिसणार निगेटिव्ह भूमिकेत ?

अर्जुन कपूर दिसणार निगेटिव्ह भूमिकेत ?

ठळक मुद्दे 'एक विलन' चित्रपटाचा येणार सीक्वल

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'एक विलन' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. यात रितेश देशमुख निगेटिव्ह भूमिकेत होता. रितेशने पहिल्यांदाच निगेटिव्ह भूमिका साकारली होती. रितेशची निगेटिव्ह भूमिकेचे सगळीकडे खूप कौतूक झाले होते. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाच्या सीक्वलबाबत चर्चा रंगली आहे. मोहित सूरी दिग्दर्शित या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये अर्जुन कपूरलासिद्धार्थ मल्होत्राच्या जागी घेण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते आहे. या सीक्वलचे दिग्दर्शन मोहित सुरी करणार आहे आणि निर्मिती एकता कपूर करणार आहे.

दरम्यान, चित्रपटासंबंधीत एका व्यक्‍तीने या वृत्तामध्ये तथ्य नसल्याचे सांगितले. या चित्रपटाच्या प्रोड्युसरने सिद्धार्थ आणि अर्जुन या दोघांची भेट घेतली असून सिद्धार्थ मल्होत्राला या चित्रपटातील मुख्य भूमिका साकारण्यासाठी अप्रोच केले आहे. तर अर्जुन कपूर निगेटिव्ह भूमिका साकारण्याची शक्‍यता आहे. मात्र, याबाबत अद्याप काहीही निश्‍चित झाले नसून या दोन्ही कलाकारांशी चित्रपटाबाबत प्राथमिक चर्चा सुरू आहे.
सिद्धार्थ मल्होत्रा सध्या लखनऊमध्ये त्याच्या आगामी 'जबरिया जोडी'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत सिंग करत आहे. तर चित्रपटात परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दुसरीकडे अर्जुन कपूर त्याच्या 'नमस्ते इंग्लंड' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपट २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'नमस्ते लंडन'चा सीक्‍वल असून त्याचे दिग्दर्शन विपुल अमृतलाल शाह यांनी केले आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Arjun Kapoor to appear in negative role?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.