खरंच की काय...या कारणामुळे कधीच होणार नाही अर्जुन कपूर आणि मलायका अरोराचे लग्न ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 14:10 IST2020-07-07T14:10:19+5:302020-07-07T14:10:50+5:30

अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा अनेक महिन्यांपासून दोघे एकमेकांना डेट करत आहेत. दोघांच्या लग्नाबाबत त्यांचे फॅन्स खूप उत्सुक आहेत

Arjun Kapoor and Malaika Arora will never get married for this reason? | खरंच की काय...या कारणामुळे कधीच होणार नाही अर्जुन कपूर आणि मलायका अरोराचे लग्न ?

खरंच की काय...या कारणामुळे कधीच होणार नाही अर्जुन कपूर आणि मलायका अरोराचे लग्न ?

अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा बॉलिवूडमधील हॉट कपल बनले आहे. अनेक महिन्यांपासून दोघे एकमेकांना डेट करत आहेत. सोशल मीडियावर दोघांनी आपले नाते जाहीरदेखील केले आहे. दोघांच्या लग्नाबाबत त्यांचे फॅन्स खूप उत्सुक आहेत. त्यात आता असे समजते आहे की अर्जुन कपूर मलायकासोबत लग्न करणार नाही आहे आणि यामागचे कारणही त्याने सांगितले आहे.


मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत अर्जुन कपूरने सांगितले की, साधारण पुरूषांचे केस लग्नानंतर गळून पडतात. पण एक कलाकार म्हणून बाल्ड लूकमध्ये कसे लग्न करणार? असेच सगळीकडे चित्र आहे. खरं सांगायचं तर मी लग्न करणार नाही आहे. मला कोणापासून काहीच लपवायचे नाही आणि माझे खासगी आयुष्य मला आदर व सन्मानाने जगायचे आहे.


पुढे अर्जुन म्हणाला की, माझे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन मला रात्री चांगले झोपण्यास मदत करते आणि मला असे वाटते की ते तशीच राहिले पाहिजे.


टाइम्स ऑफ इंडियाशी मलायकाने याबद्दल सांगितले की, आम्ही एकावेळी एकच पाऊल उचलतो. लग्नासाठी तर्कवितर्क लावून चालणार नाही. एकावेळी एकच पाउल उचलू शकतो. आम्ही कुठे उभे आहोत याबद्दल खूप प्रामाणिक आहोत.  जसजसे पुढे गोष्टी ठरतील तसे तुम्हाला कळवू.


काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूर लग्नाच्या अफवांवर म्हणाला, मी लग्न करत नाहीय. मी 33 वर्षांचा आहे, मला लग्न करण्याची कोणतीच घाई नाही आहे. लग्न हा असा निर्णय आहे, ज्याबद्दल मी माझ्या कुटुंबाचा आधी सल्ला घेईन. माझ्या लग्नाबद्दल काही असेल तर तुम्हाला चे नक्कीच कळेल.अशा अफवांमुळे कोणतेही नुकसान होत नाही, परंतु मला पुन्हा त्याच गोष्टीचे उत्तर देणे आवडत नाही. माझी कोणतीही तक्रार नाही, परंतु अफवा पसरवण्याऱ्या लोकांना प्रत्येक वेळी प्रतिसाद देणे खूप त्रासदायक बनते.

Web Title: Arjun Kapoor and Malaika Arora will never get married for this reason?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.