दो दिल मिल रहे हैं मगर...! अर्जुन कपूर झाला रोमॅन्टिक!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 11:04 IST2019-09-02T11:04:19+5:302019-09-02T11:04:28+5:30
काळासोबत मलायका अरोरा व अर्जुन कपूर यांचे नाते आणखी घट्ट होताना दिसत आहे. बॉलिवूडच्या सर्वाधिक चर्चित जोडीत सामील असलेले हे कपल सध्या सुट्टीचा आनंद घेत आहे.

दो दिल मिल रहे हैं मगर...! अर्जुन कपूर झाला रोमॅन्टिक!!
काळासोबत मलायका अरोरा व अर्जुन कपूर यांचे नाते आणखी घट्ट होताना दिसत आहे. बॉलिवूडच्या सर्वाधिक चर्चित जोडीत सामील असलेले हे कपल सध्या सुट्टीचा आनंद घेत आहे. यादरम्यानचे दोघांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या मलायका व अर्जुन ऑस्ट्रियात आहेत.
कालचा रविवार दोघांनीही एकत्र घालवला. यादरम्यान अर्जुनने टिपलेला एक स्वत:चा एक फोटो मलायकाने शेअर केला. हॅपी संडे असे कॅप्शन तिने या फोटोला दिले. यानंतर अर्जुन व मलायकांनी ऑस्ट्रियातील लोकप्रिय द मोजार्ट कॅफेमधील फोटो शेअर केला. शॉपिंगशिवाय हे कपल शॉपिंग करतानाही दिसले. शिवाय चर्चमध्येही गेलेत.
याचदरम्यान अर्जुन कपूरचे रोमॅन्टिक मूडही दिसले. अर्जुनने इन्स्टास्टोरीवर एक फोटो शेअर केला. यात दोन आर्टिफिशल हार्ट दिसत आहे. या फोटोवर ‘दो दिल मिल रहे हैं मगर...,’असे अर्जुनने लिहिले आहे.
अर्जुन व मलायका लवकरच लग्न करणार असे मानले जात आहे. पण दोघांनीही या सगळ्या अफवा असल्याचे म्हटले आहे. अलीकडे एका मुलाखतीत बोलताना मलायकाने, सध्या आमचा लग्नाचा कुठलाही प्लान नसल्याचे म्हटले होते. मी आनंदी आहे. या आनंदाचे कारण सांगण्याचे, त्यावर स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. प्रत्येकाबद्दल अफवा उठतात, असेही ती म्हणाली होती.
सध्या अर्जुन कपूर ‘पानीपत’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी आहे.