​अर्जून बनणार ‘लखन’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2016 17:32 IST2016-09-24T12:02:11+5:302016-09-24T17:32:11+5:30

अर्जूनने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यात तो हातात ‘डफली’ घेतलेला दिसतो आहे आणि या डफलीवर लिहिलेय, ‘लखन’.

Arjun to become 'Lakhan'? | ​अर्जून बनणार ‘लखन’?

​अर्जून बनणार ‘लखन’?

िल कपूर यांच्या एकेकाळी तुफान गाजलेल्या ‘राम लखन’ हा सिनेमाचे गारूड आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. या चित्रपटाचा रिमेक येणार, अशी चर्चा बºयाच दिवसांपासून बॉलिवूडमध्ये सुरु आहे. मात्र याबाबत अधिकृत कुठलीही घोषणा झालेली नव्हती. पण आता अनिल कपूरचा पुतण्या अर्जून कपूर याने मात्र एक फोटो पोस्ट करून या चर्चेला नव्याने हवा दिली आहे. अर्जूनने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यात तो हातात ‘डफली’ घेतलेला दिसतो आहे आणि या डफलीवर लिहिलेय, ‘लखन’. या फोटोसोबत अर्जूनने दिलेले कॅप्शनही काहीतरी खुणावणारे आहे. ‘कुछ चीजें हमेशा आइकॉनिक रहती हैं, और आपको अपने बड़े होने के दिनों की याद दिलाती हैं.  डफली उस दौर की है, जब मैं बड़ा हो रहा था और राम लखन मेरी फेवरिट है’, असे कॅप्शन त्याने दिले आहे.
अर्जूनच्या या फोटो वा कॅप्शनवरून तो ‘राम लखन’च्या रिमेकमध्ये काम करणार वा नाही, हे तर कळत नाहीयं. पण ८० च्या दशकातील या अपार लोकप्रीय चित्रपटाचा रिमेक बनणार असेल तर त्यात काम करायला अर्जून अगदी सज्ज आहे, हे यावरून अगदी पक्के कळतेय. प्रारंभी सुभाष घई ‘राम लखन’चा रिमेक बनवणार अशी चर्चा आहे. पण नंतर रोहित शेट्टी या चित्रपटाचा रिमेक घेऊन येणार, अशी खबर आली. अर्थात त्यांनी हा रिमेक तूर्तास बनणार नसल्याचे स्पष्ट केले होते. कारण कुठलाही यंग अ‍ॅक्टर या दोन हिरो असलेल्या चित्रपटात काम करण्यास तयार नव्हता. आता अर्जूनच्या या फोटोतून कुठली बातमी समोर येते, ते बघूच!










 

Web Title: Arjun to become 'Lakhan'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.