"जीव रंगला...", अरिजीत सिंहने गायलं मराठी गाणं, व्हिडिओ पाहून तुम्ही कराल कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 12:10 IST2025-03-18T12:08:30+5:302025-03-18T12:10:02+5:30
अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

"जीव रंगला...", अरिजीत सिंहने गायलं मराठी गाणं, व्हिडिओ पाहून तुम्ही कराल कौतुक
Arijit Singh in Pune : अरिजीत सिंह हा लोकप्रिय गायक आहे. त्याचे संपूर्ण जगभरात चाहते आहेत. त्याची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. भारतीयांच्या मनात घर करुन असलेला हा गायक आवाजाची जादू पसरवत आहे. आता अरिजीत सिंहनं थेट मराठीतील "जीव रंगला..." (Arijit Singh Sings Jeev Rangala Marathi Song) हे लोकप्रिय गाणं गायलं आहे. अक्षरश: प्रेक्षकांना मराठी भाषिक वाटावा, या पद्धतीने त्याने हे गाणं गायलंय. अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
"जीव रंगला..." या गाण्याची अरिजीतलाही भुरळ पडली आहे. अरिजीत सिंह याने नुकतंच पुण्यात कॉन्सर्ट घेतला. यावेळी त्याने मराठीतील लोकप्रिय गाणं "जीव रंगला..." हे गायलं. अरिजीतच्या आवाजात "जीव रंगला..." हे गाणं ऐकून चाहते अक्षरश: ओरडायला लागले. रसिकांमधून एकच जल्लोष पाहायला मिळत आहे. अस्खलित मराठीत अरिजीत "जीव रंगला..." गाणं गाताना दिसत आहे. त्याच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं आहे.
Arijit Singh sings the famous Marathi love song 'Jeev Rangla' by Ajay-Atul in Pune pic.twitter.com/qhWhwHgbLK
— chittaranjan (@i_CHITTARANJAN1) March 17, 2025
मराठी गाणं आणि तेही अरिजितच्या आवाजात, हे डेडली कॉम्बिनेशन ऐकल्यानंतर मराठी प्रेक्षक तृप्त झालाय. "जीव रंगला..." हे गाणं 'जोगवा' या सुपरहिट मराठी चित्रपटालं आहे. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. हे गाणं प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल आणि गायक हरिहरन यांनी गायलं आहे. या गाण्याची निर्मिती अजय-अतुल यांनी केली होती.
अरिजीतबद्दल बोलायचं झालं तर एका गाण्याच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावतो. पण, खऱ्या आयुष्यात मात्र त्याला साधं राहायला आवडतं. त्याचं साधं राहणीमान चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतं. चाहते नेहमीच त्याच्या आवाजाची प्रतीक्षा करत असतात. चाहते त्याला 'किंग ऑफ प्लेबॅग सिंगिंग' असं म्हणतात.