"मी खूप नर्व्हस आहे...", निवृत्तीच्या घोषणेनंतर अरिजीत सिंग स्टेजवर पुन्हा परतला, गायकाला पाहून चाहते गहिवरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 10:01 IST2026-02-09T09:59:58+5:302026-02-09T10:01:50+5:30
निवृत्तीच्या घोषणेनंतर अरिजीत सिंग स्टेजवर पुन्हा परतला,लाईव्ह परफॉर्मन्स पाहून चाहते गहिवरले

"मी खूप नर्व्हस आहे...", निवृत्तीच्या घोषणेनंतर अरिजीत सिंग स्टेजवर पुन्हा परतला, गायकाला पाहून चाहते गहिवरले
Arijit Singh: बॉलिवूडचा लोकप्रिय गायक अरिजीत सिंह मागील काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच अरिजीत सिंगने पार्श्वगायनातून निवृत्ती जाहीर केली आहे. जी कामे आधीपासून घेतली आहे, ती पूर्ण करणार, त्यानंतर चित्रपटांमध्ये पार्श्वगायन करणार नसल्याचं अरिजीत सिंगने म्हटलं आहे. त्याच्या या निर्णयाचा अनेकांना धक्काच बसला. अरिजीतच्या या निर्णयावर इंडस्ट्रीतील बऱ्याच सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिली. अशातच अरिजीतने पुन्हा एकदा चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. निवृत्ती जाहीर केल्यानंतर काही दिवसांतच अरिजित सिंगने आता दमदार कमबॅक केलं आहे.
प्लेबॅक सिंगमधून निवृ्त्ती घेतल्यानंतर तो पुन्हा एकदा स्टेज परफॉर्मन्स करण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच काल रविवारी कोलकत्तामध्ये त्याने लाईव्ह स्टेज परफॉर्मन्स केला. कोलकत्तामधील नेताजी इनडोअर स्टेडियममध्ये सितारवादक अनुष्का शंकर यांच्यासोबत त्याने परफॉर्मन्स केला. अनुष्का शंकर यांच्या चॅप्टर्स टूर २०२६ या कार्यक्रमात अरिजीतने पाहुणा कलाकार म्हणून भाग घेतला होता. अनुष्का यांनी त्यांना स्टेजवर आमंत्रित करताच प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाट केला. याचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्ये चाहते अरिजीतला गाताना पाहून भावुक झाल्याचे पाहायला मिळत आहेत.

यादरम्यान, स्टेजवर येताच अरिजीत हसला आणि प्रेक्षकांना म्हणाला, "मी खूप घाबरलो आहे. मला आत घेतल्याबद्दल धन्यवाद." यावेळी अरिजीत,अनुष्का आणि ब्रिक्रम घोष यांनी एकत्र माया भोरा राती गाणं गायलं. हे एक बंगाली गाणे आहे, लक्ष्मी शंकर यांच्या आवाजात हे गाणे स्वरबद्ध करण्यात आलं आहे. तर पंडित रवि शंकर यांनी कम्पोझिशन केलंय.
लाईव्ह शोमध्ये अरिजीत आणि अनुष्काने नोरा जोन्सचं गाणे ट्रेसेस ऑफ यू चा डुएट सुद्धा गायलं. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अरिजीतचे चाहते प्रचंड भावुक झाले आहेत. मी खूपच इमोशनल झालो आहे, एकाच वेळी आनंदी आणि दु:ख झाल्याचं जाणवतंय. तर आणखी एका यूजरने म्हटलंय, असं वाटतंय जणू बऱ्याच वर्षानंतर तुझा आवाज ऐकतोय."