OMG!! रश्मिका मंदाना व विजय देवरकोंडा रिलेशनशिपमध्ये? सोशल मीडियावर फोटोंची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 10:26 IST2022-01-04T10:24:59+5:302022-01-04T10:26:27+5:30

Rashmika Mandanna And Vijay Devarakonda : रश्मिका विजय देवरकोंडाला डेट करतेय, अशी चर्चा अनेक दिवसांपासून आहे. अर्थात रश्मिका व विजय देवरकोंडा दोघंही काहीही बोलायला तयार नाहीत. पण आता...

Are Rashmika Mandanna And Vijay Devarakonda Dating Each Other | OMG!! रश्मिका मंदाना व विजय देवरकोंडा रिलेशनशिपमध्ये? सोशल मीडियावर फोटोंची चर्चा

OMG!! रश्मिका मंदाना व विजय देवरकोंडा रिलेशनशिपमध्ये? सोशल मीडियावर फोटोंची चर्चा

तेलगू व कन्नड चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. पण सध्या रश्मिका चर्चेत आहे ती, तिच्या डेटींगच्या चर्चेमुळे. होय, रश्मिका विजय देवरकोंडाला  (Vijay Devarakonda) डेट करतेय, अशी चर्चा अनेक दिवसांपासून आहे. अर्थात रश्मिका व विजय देवरकोंडा दोघंही यावर काहीही बोलायला तयार नाहीत. पण लपवून लपणार किती? कारण सोशल मीडियावरच्या फोटोंनी आता सगळंच उघड केलं आहे. हे सुपरहिट कपल सध्या गोव्यात एकत्र सुट्टी साजरी करतंय.

नव्या वर्षाच्या मुहूर्तावर रश्मिकाने चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देत पूल साईडचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोत रश्मिका मंदाना एकटी उभी दिसतेय. पण खरी बातमी पुढे आहे.

होय, रश्मिकाने हा फोटो शेअर केला आणि यानंतर विजय देवरकोंडाचा भाऊ आनंद देवरकोंडा याने नेमक्या याच बॅकग्राऊंड व लोकेशनचा फोटो पोस्ट केला. मग काय, नेटकऱ्यांनी समजायचं ते समजलं. रश्मिका विजय देवरकोंडा व त्याच्या कुटुंबासोबत आहे, हे नेटकऱ्यांनी नेमकं हेरलं.

 रश्मिका व विजयची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. गीता गोविंदम आणि डिअर कॉम्रेड  या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलं आहे.

रश्मिकाच्या वर्क फ्रंटविषयी बोलायचं झाल्यास ती  लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. महानायक अमिताभ बच्चन आणि नीना गुप्ता यांच्यासोबत ‘गुडबाय’ या चित्रपटात ती झकळणार आहे. याशिवाय ‘मिशन मजनू’ या बॉलिवूडपटातही तिची वर्णी लागली आहे. या चित्रपटात  सिद्धार्थ मल्होत्रा तिचा हिरो असणार आहे. विजय देवरकोंडाचा ‘लायगर’ हा सिनेमाही येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. यात त्याच्यासोबत अनन्या पांडे मुख्य भूमिकेत  पाहायला मिळणार आहे.

Web Title: Are Rashmika Mandanna And Vijay Devarakonda Dating Each Other