​अर्जूनवर का भडकले मोहित सूरी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2016 17:34 IST2016-08-30T12:04:13+5:302016-08-30T17:34:13+5:30

बॉलिवूड अभिनेता  अर्जून कपूरच्या चाहत्यांचे मन खट्टू करणारी एक बातमी आहे. होय, ‘हाफ गर्लफ्रेन्ड’च्या सेटवर अर्जूनच्या बेजबाबदार वागण्यामुळे ‘हाफ ...

Ardhavnar bhadake Mohit Suri? | ​अर्जूनवर का भडकले मोहित सूरी?

​अर्जूनवर का भडकले मोहित सूरी?

लिवूड अभिनेता  अर्जून कपूरच्या चाहत्यांचे मन खट्टू करणारी एक बातमी आहे. होय, ‘हाफ गर्लफ्रेन्ड’च्या सेटवर अर्जूनच्या बेजबाबदार वागण्यामुळे ‘हाफ गर्लफ्रेन्ड’चे दिग्दर्शक मोहित सूरी यांच्या नाकीनऊ आले आहे. याच मुद्यावरून ‘हाफ गर्लफ्रेन्ड’चे दिग्दर्शक मोहित सूरी व अर्जून यांच्यात वादावादी झाल्याचीही खबर आहे.  ‘हाफ गर्लफ्रेन्ड’च्या पहिल्या शेड्युलची शूटींग दिल्ली पार पडले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील याच शूटींगदरम्यान अर्जूनच्या रोजच्या पार्ट्या आणि  त्याचे रिटेक्स यामुळे मोहित जाम वैतागले होते. केवळ अर्जूनच्या सेटवर उशीरा येण्याची बाब असतील तर कदाचित मोहित यांनी त्याकडे दुर्लक्षही केले असते. पण गोष्ट अर्जूनच्या परफॉर्मन्सशी जुळलेली असल्याने मोहित स्वत:ला रोखू शकले नाही आणि त्यांनी अर्जूनला चांगलेच सुनावले. शूटींग संपले रे संपले की, अर्जून फाईवस्टार हॉटेलात पार्टी करायला निघून जायचा. या पार्ट्या रात्री उशीरापर्यंत चालायच्या. एका पार्टीचा खर्च जवळपास १ लाख रुपए यायचा. शिवाय लेट नाईट पार्टीमुळे अर्जून सकाळी सेटवर उशीरा पोहोचायचा, ते वेगळेच. सुरुवातीला मोहित सूरी यांनी याकडे दुर्लक्ष केले. पण अर्जूनचे रोजचेच झाल्यामुळे मोहित सूरींच्या संतापाचा कडेलोट झाला. इतका की हा वाद भांडणापर्यंत पोहोचला. आता ‘हाफ गर्लफ्रेन्ड’च्या दुसºया शेड्यूलचे शुटींगही संपले आहे. पण दिल्लीतील या वादाचा प्रभाव इतक्या सहजी कसा विसरता येईल!!

Web Title: Ardhavnar bhadake Mohit Suri?