अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया सिनेइंडस्ट्रीत करतेय एन्ट्री, पहा तिच्या पहिल्या प्रोजेक्टची झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 06:00 IST2019-10-17T06:00:00+5:302019-10-17T06:00:00+5:30
मलायकाशी घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज खान इटालियन मॉडल जॉर्जियाला डेट करतोय आहे.

अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया सिनेइंडस्ट्रीत करतेय एन्ट्री, पहा तिच्या पहिल्या प्रोजेक्टची झलक
मलायकाशी घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज खान इटालियन मॉडल जॉर्जियाला डेट करतोय आहे. दोघांना अनेक वेळा सार्वजनिक ठिकाणी आणि पार्टीमध्ये पाहिले जाते. मात्र जॉर्जिया एंड्रियानी इटालियन मॉडेल, नर्तिका व अभिनेत्री आहे. फॅशन जगतात तिचे खूप मोठे नाव आहे. तिने ३०हून अधिक फॅशन शो केले आहेत आणि सर्वोत्कृष्ट फॅशन आयकॉनमध्ये तिचे नाव आहे. आता ती तमीळ वेबसीरिजमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करते आहे. या वेबसीरिजचे नाव आहे करोलिन कामाक्षी. या सीरिजमध्ये करोलिनची मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.
जॉर्जिया एंड्रियानीची तमीळ वेब करोलिन कामाक्षीचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.
इंटरपोलची कॅरोलिन आणि सीबीआयची कामाक्षी असे दोन अधिकारी आहेत, ज्या विरोधी व्यक्तिमत्त्वाचे आहेत. परंतु धोकादायक माफिया डॉनची शिकार करण्यासाठी ते एकत्र आले आहेत. असे टीझरमध्ये दाखवले आहे. या टीझरमध्ये जॉर्जिया एक्शन आणि कॉमेडी दोन्ही करताना दिसणार आहे. वेब सीरिजला चेन्नई आणि पाँडिचेरीमध्ये शूट केले आहे.
करोलिन कामाशीचा १० भागांचा पहिला सीझन लवकरच झी 5 वर प्रसारित होणार आहे. विवेककुमार कनंन दिग्दर्शित ‘एक्शन-पॅक्ड कॉमेडी-ड्रामा’ या वेब सीरिज मध्ये पहायला मिळणार आहे.
जॉर्जिया करोलिन कामाक्षी या वेबसीरिज व्यतिरिक्त लवकरच ‘श्री देवी बंगलो’ या बहुप्रतिक्षित चित्रपटात झळकणार आहे.