खान कुटुंबात आली परी! अरबाज खान लेकीला घेऊन निघाला; रुग्णालयाबाहेरील व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 15:55 IST2025-10-08T15:55:11+5:302025-10-08T15:55:38+5:30
वयाच्या ५८ व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान

खान कुटुंबात आली परी! अरबाज खान लेकीला घेऊन निघाला; रुग्णालयाबाहेरील व्हिडीओ व्हायरल
अभिनेता अरबाज खान वयाच्या ५८ व्या वर्षी तो पुन्हा बाबा झाला. त्याची दुसरी पत्नी शुरा खानने दोन दिवसांपूर्वी गोंडस मुलीला जन्म दिला. छोट्या परीच्या येण्याने खान कुटुंबात उत्साहाचं वातावरण आहे. नुकतंच शुरा आणि लेकीला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. अरबाज खान चिमुकलीला कडेवर घेऊन गाडीत बसताना दिसला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अरबाज खान पत्नी शुरा आणि नवजात मुलीला घेऊन रुग्णालयातून घरी रवाना झाला. गाडीत बसताना त्याची झलक दिसली. त्याने लेकीला कडेवर घेतलं असून मागून शुराची आई आणि मुलगीही दिसली. कारमध्ये बसताना अरबाज पापाराझींकडे पाहून हसतानाही दिसतो. खान कुटुंबाचा रुग्णालयाबाहेरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अरबाजने शूरासोबत २०२३ मध्ये निकाह केला होता. त्या दोघांमध्ये २२ वर्षाचं अंतर आहे. अरबाज खान ५८ वर्षांचा आहे तर शूरा ३५ वर्षांची आहे. अरबाजचं हे दुसरं लग्न आहे. त्याने मलायकासोबत १९९८ मध्ये संसार थाटला होता. पण २०१७मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले. त्याला २२ वर्षांचा अरहान हा मुलगादेखील आहे. तर दोन दिवसांपूर्वी ६ ऑक्टोबर रोजी शूराने लेकीला जन्म दिला. तिला पहिल्या पतीपासून आधीच एक मुलगी आहे.