अरबाज खानच्या बेटिंगमुळे वैतागली होती मलाइका अरोरा, वाचा धक्कादायक खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2018 16:56 IST2018-06-02T11:26:08+5:302018-06-02T16:56:08+5:30
आयपीएल बेटिंग प्रकरणात बॉलिवूड अभिनेता तथा निर्माता अरबाज खान याचे नाव समोर आले आहे. सूत्रानुसार त्याने आयपीएल दरम्यान बेटिंग ...

अरबाज खानच्या बेटिंगमुळे वैतागली होती मलाइका अरोरा, वाचा धक्कादायक खुलासा!
आ पीएल बेटिंग प्रकरणात बॉलिवूड अभिनेता तथा निर्माता अरबाज खान याचे नाव समोर आले आहे. सूत्रानुसार त्याने आयपीएल दरम्यान बेटिंग लावल्याची कबुली पोलिसांना दिल्याची माहिती समोर येत आहे. आता आणखी एक मोठा आणि धक्कादायक खुलासा समोर येत असून, अरबाजची पूर्व पत्नी मलाइका अरोरा हिच्याशी तो संबंधित आहे. असे म्हटले जात आहे की, अरबाजची पूर्व पत्नी मलाइका अरोरा अरबाजच्या या व्यसनाला प्रचंड वैतागली होती. या कारणामुळेच तिने त्याची साथ सोडली आहे.
दरम्यान, ठाण्याच्या गुन्हे शाखेने शुक्रवारी अरबाजला समन्स बजावून चौकशीसाठी बोलाविले होते. त्यानुसार रविवारी तो ठाणे क्राइम ब्रॅँचसमोर हजर झाला होता. यावेळी वरिष्ठ अधिकारी प्रदीप शर्मा यांनी त्याची कसून चौकशी केली. विशेष म्हणजे प्रदीप शर्मा यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना त्याने गेल्या सहा वर्षांपासून सट्टा खेळत असल्याची कबुली दिली.
![]()
प्रदीप शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली गठित करण्यात आलेल्या पाच सदस्यीय टीमसमोर अरबाजने सांगितले की, माझ्या बेटिंगबद्दल घरातील सर्व सदस्यांना माहिती आहे. यावेळी अरबाजने अनेक धक्कादायक खुलासे केल्याची माहितीही समोर येत आहे. दरम्यान, ठाणे पोलिसांनी गेल्या १५ मे रोजी बेटिंगचे रॅकेट उद्ध्वस्त करताना यातील काही संशयितांना अटक केली होती. यामध्ये सोनू जालान ऊर्फ सोनू मलाड या प्रमुख संशयिताकडून अरबाज खानचे नाव समोर आले होते. त्याला २९ मे रोजी पोलिसांनी अटक केली होती.
पोलिसांना सोनू मलाडच्या घरातून एक डायरी मिळाली होती. डायरीमध्ये अरबाज खान समवेत कॉन्ट्रॅक्टर, बिल्डर आणि बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, अरबाज खान सुपरस्टार सलमान खानचा भाऊ असून, तो एक अभिनेता असण्याबरोबर दिग्दर्शकही आहे. त्याने ‘दबंग, दबंग-२ आणि डॉली की डोली’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.