'आम्ही जास्त बोलत नाही पण...', अरबाजचा खुलासा; खान भावंडांमध्ये काय बिनसलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 02:02 PM2024-04-13T14:02:47+5:302024-04-13T14:03:27+5:30

सलमानसोबतच्या त्याच्या नात्यावर काय म्हणाला अरबाज? वाचा

Arbaaz Khan reveals how is his relationship with brother Salman Khan says we wont talk to each other | 'आम्ही जास्त बोलत नाही पण...', अरबाजचा खुलासा; खान भावंडांमध्ये काय बिनसलं?

'आम्ही जास्त बोलत नाही पण...', अरबाजचा खुलासा; खान भावंडांमध्ये काय बिनसलं?

बॉलिवूडमध्ये खान कुटुंब नेहमीच चर्चेत असतं. सलमान खान तर सुपरस्टार आहे. तसंच त्याचा भाऊ अरबाज खानही (Arbaaz Khan) अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता आहे. सलमान (Salman Khan), अरबाज आणि सोहेल या तीनही भावांमध्ये खूप प्रेम आहे हे नेहमीच त्यांच्यातील बाँडवरुन दिसून येतं. मात्र प्रत्यक्षात हे तिघंही एकमेकांशी रोज बोलतच नाहीत असा खुलासा अरबाज खानने केला आहे. सलमानसोबतच्या त्याच्या नात्यावर काय म्हणाला अरबाज? वाचा

अरबाज खानने नुकतंच एका पॉडकास्टमध्ये सलमानसोबतच्या नात्यावर भाष्य केलं. तो म्हणाला, "आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आहोत. जेव्हा आम्ही छोटे होतो तेव्हा सोबतच राहायचो. मात्र आता तसं नाहीए. आम्ही रोज बोलत नाही. मात्र जेव्हा कोणी अडचणीत असतं तेव्हा आम्ही एकमेकांसाठी खंबीरपणे उभं राहतो. सलमानने कधी लग्न केलं नाही पण मी आणि सोहेलने केलं. त्यामुळे आमच्यात थोडा दुरावा आला. आम्ही वेगवेगळे राहायला लागलो."

तो पुढे म्हणाला, "अडचणीच्या काळात भलेही कुटुंबातील इतर लोक निराश करतील पण आम्ही भाऊ एकमेकांना कधीच निराश करत नाही. आम्ही एकमेकांच्या मागे उभे असतो. सलमान आम्हाला जास्त भेटत नाही आणि आमच्याशी बोलतही नाही. पण जेव्हा त्याला कळतं की आम्ही संकटात आहोत तेव्हा मात्र सर्वात आधी तो मदतीसाठी तत्पर असतो."

अरबाज खानने नुकतंच शूरा सोबत दुसरं लग्न केलं. तसंच त्याने रवीना टंडनसोबत 'पटना शुक्ला' सीरिजचीही निर्मिती केली. तर सोहेल खान मात्र बॉलिवूडपासून दूर व्यवसायावर लक्ष देत आहे. सलमान आणि अरबाज दोन्ही भाऊ बॉलिवूड गाजवत आहेत.

Web Title: Arbaaz Khan reveals how is his relationship with brother Salman Khan says we wont talk to each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.