पुन्हा एकदा दिसणार चुलबुल पांडे! सलमान खानच्या दबंग 4 बद्दल अरबाज खानकडून मोठं अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 01:24 PM2024-03-18T13:24:42+5:302024-03-18T14:00:59+5:30

सलमान खानचा भाऊ अरबाज खान याने अत्यंत मोठे अपडेट दिले आहे.

arbaaz khan confirms salman khan dabangg 4 check what he said about releaseof film | पुन्हा एकदा दिसणार चुलबुल पांडे! सलमान खानच्या दबंग 4 बद्दल अरबाज खानकडून मोठं अपडेट

पुन्हा एकदा दिसणार चुलबुल पांडे! सलमान खानच्या दबंग 4 बद्दल अरबाज खानकडून मोठं अपडेट

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान कायमच चर्चेत राहणारा अभिनेता आहे. सलमानची फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त आहे. आपल्या आवडत्या अभिनेत्याला टीव्हीवर पाहण्यासाठी चाहते कायमच आतुर असतात. सलमानच्या आगामी चित्रपटाची चाहते वाट पाहात आहेत. यामध्ये आता सलमान खानचा भाऊ अरबाज खान याने अत्यंत मोठे अपडेट दिले आहे.

हिट कॉमेडी ड्रामा फ्रँचायझी चित्रपट 'दबंग' बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या फ्रँचायझीच्या पहिल्या चित्रपटाने प्रचंड कलेक्शन करून सलमान खानच्या करिअरचं स्टारडम वाढवलं. या सिनेमाच्या तीन भागांनंतर आता चाहत्यांना चित्रपटाच्या चौथ्या भागाची प्रतीक्षा आहे. सलमान खानचा धाकटा भाऊ अरबाज खान याने 'दबंग 4' बाबत मोठी घोषणा केली आहे. चित्रपटाचा चौथा भाग येणार असल्याच्या वृत्ताला त्यानं दुजोरा दिला आहे. म्हणजेच 'दबंग 4' येणार हे निश्चित झालं आहे. 

सलमान खान आणि अरबाज खान यांनी 'जवान' सिनेमाचा दिग्दर्शक ऍटली कुमारची भेट घेतल्याची चर्चा बीटाऊनमध्ये रंगली होती. पण, अरबाज खानने या अफवांचं खंडण केलं आहे. तो म्हणाला, 'मी चित्रपट निर्माता एटलीला कधीही भेटलो नाही. ही एक निव्वळ अफवा आहे'. तर टाईम्सच्या वृत्तानुसार, अरबाज खान 'दबंग 4'च्या रिलीजबद्दल म्हणाला, 'जेव्हा योग्य वेळ येईल, तेव्हाच हा चित्रपट प्रदर्शित होईल'. 

'दबंग 4'मध्ये पुन्हा एकदा 'चुलबुल पांडे' म्हणजेच सलमान खानची दमदार शैली पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या चित्रपटाशिवाय त्याच्या इतर प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झालं तर, अभिनेत्याकडे करण जोहरचा 'द बुल' हा सिनेमा आहे. याशिवाय 'टायगर व्हर्सेस पठाण' देखील रांगेत आहेत. सलमानचा हा चित्रपट शाहरुख खानसोबत असणार आहे. तर तो शेवटचा 'टायगर 3' मध्ये कतरिना कैफ आणि इमरान हाश्मीसोबत दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला.
 

Web Title: arbaaz khan confirms salman khan dabangg 4 check what he said about releaseof film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.