अरबाज खाननं खरेदी केली ₹2.78 कोटींची प्रॉपर्टी! मोजकेच हिट चित्रपट, पण ₹500 कोटींची नेट वर्थ; कशी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 20:44 IST2026-02-22T20:43:13+5:302026-02-22T20:44:01+5:30

अरबाज शेवटचा "काल त्रिघोरी" मध्ये दिसला होता. यानंतर, आता तो लवकरच 'बिहू अटॅक', 'श्रीदेवी बंगलो' आणि 'केसर सिंह' यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

Arbaaz Khan bought a property worth ₹2 crores 78 lakhs Few hit films, but a net worth of ₹500 crores | अरबाज खाननं खरेदी केली ₹2.78 कोटींची प्रॉपर्टी! मोजकेच हिट चित्रपट, पण ₹500 कोटींची नेट वर्थ; कशी?

अरबाज खाननं खरेदी केली ₹2.78 कोटींची प्रॉपर्टी! मोजकेच हिट चित्रपट, पण ₹500 कोटींची नेट वर्थ; कशी?

बॉलीवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता अरबाज खानने आपल्या मुंबईतील रिअल इस्टेट मालमत्तेत आणखी भर घातली आहे. त्याने नुकताच जोगेश्वरी वेस्ट भागात २.७८ कोटी रुपयांना एक आलिशान अपार्टमेंट (फ्लॅट) विकत घेतल्याचे वृत्त आहे. 'जैपकी'कडून मिळालेल्या प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन पेपर्सनुसार, हा व्यवहार याच महिन्याच्या सुरुवातीला पूर्ण झाल्याचे समजते.

२२,००० रुपये प्रति चौरस फूट दराने व्यवहार
हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, अरबाजचे हे नवीन अपार्टमेंट जोगेश्वरी वेस्ट येथील लिंक रोडवर असलेल्या 'ऑटोग्राफ रेसिडेन्सी' या प्रकल्पात आहे. इमारतीच्या २७ व्या मजल्यावर असलेल्या या फ्लॅटचा रेरा कारपेट एरिआ १,२४३ चौरस फूट एवढा आहे. अरबाजने हा व्यवहार २२,००० रुपये प्रति चौरस फूट दराने केला. यात दोन पार्किंग स्लॉट्सचाही समावेश आहे. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी ही खरेदी प्रक्रिया पूर्ण झाली असून, अरबाजने यासाठी १६ लाखांहून अधिक मुद्रांक शुल्क आणि ३०,००० रुपये नोंदणी शुल्क भरले आहे. हा प्रकल्प डिसेंबर २०३० पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

५०० कोटींची नेट-वर्थ
अरबाज खानची एकूण संपत्ती सुमारे ५०० कोटी रुपये एवढी आहे. चित्रपट निर्मिती हे त्याच्या उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास, अरबाज आणि त्याची पत्नी शूरा खान यांना डिसेंबर २०२३ मध्ये लग्न केले आणि नोव्हेंबर २०२५ मध्ये त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे.

आगामी चित्रपट -
अरबाज शेवटचा "काल त्रिघोरी" मध्ये दिसला होता. यानंतर, आता तो लवकरच 'बिहू अटॅक', 'श्रीदेवी बंगलो' आणि 'केसर सिंह' यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

Web Title : अरबाज खान ने खरीदी ₹2.78 करोड़ की संपत्ति, हिट फिल्में कम।

Web Summary : अरबाज खान ने मुंबई के जोगेश्वरी वेस्ट में ₹2.78 करोड़ का अपार्टमेंट खरीदा। 1,243 वर्ग फुट के फ्लैट की कीमत ₹22,000 प्रति वर्ग फुट है, जिसमें पार्किंग शामिल है। लगभग ₹500 करोड़ की संपत्ति के साथ, उनकी आय मुख्य रूप से फिल्म निर्माण से होती है। वह जल्द ही कई फिल्मों में दिखेंगे।

Web Title : Arbaaz Khan buys ₹2.78 crore property despite few hits.

Web Summary : Arbaaz Khan acquired a ₹2.78 crore apartment in Mumbai's Jogeshwari West. The 1,243 sq ft flat, costing ₹22,000 per sq ft, includes parking. With a net worth around ₹500 crore, his income primarily comes from film production. He is soon to appear in multiple films.