थोडक्यात बचावला A. R. Rahman चा मुलगा; लाइव्ह परफॉर्मन्स देतांना डोक्यावर कोसळलं झुंबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 10:18 IST2023-03-06T10:17:04+5:302023-03-06T10:18:20+5:30

A.R.ameen: अमीनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

ar rahmans son ar ameen has narrowly escaped a accident | थोडक्यात बचावला A. R. Rahman चा मुलगा; लाइव्ह परफॉर्मन्स देतांना डोक्यावर कोसळलं झुंबर

थोडक्यात बचावला A. R. Rahman चा मुलगा; लाइव्ह परफॉर्मन्स देतांना डोक्यावर कोसळलं झुंबर

प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान (A. R. Rahman) याचा मुलगा ए. आर. अमीन (A. R. Ameen) एका दुर्घटनेतून थोडक्यात बचावला आहे. लाइव्ह परफॉर्मन्स देत असताना त्याच्या डोक्यावर अचानकपणे झुंबर कोसळलं. या घटनेतून तो थोडक्यात बचावला असून याविषयी त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. अमीनने दिलेल्या या माहितीनंतर त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरल्याचं पाहायला मिळत आहे.

नेमकं काय घडलं अमीनसोबत

अलिकडेच ए. आर. अमीन एका प्रोजेक्टचं शूट करत होता. हा कार्यक्रम लाईव्ह सुरु असतानाच अचानकपणे वर लावलेलं झुंबर कोसळलं. इतकंच नाही तर जर मी एक सेकंद जरी मागे पुढे झालो असतो, तर मोठा अनर्थ झाला असता, असं अमीन म्हणाला.

"मी अल्लाहचे, माझ्या आई-वडिलांचे, कुटुंबाचे आणि माझ्या चाहत्यांचे आभार मानतो मी सुरक्षित असल्याबद्दल…तीन दिवसापूर्वी एक मोठी घटना घडली. मी एका गाण्यासाठी शूटिंग करत होतो आणि मला माझ्या टीमवर पूर्ण विश्वास होता की त्यांनी सुरक्षेची पुरेपूर काळजी घेतली असेल. त्यामुळे माझं सगळं लक्ष कॅमेरवर होतं. पण, त्याचवेळी वरचं झुंबर क्रेनमधून निसटलं आणि खालती कोसळलं. त्यावेळी मी बरोबर स्टेजच्या मध्यभागी उभा होतो", असं अमीन म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "जर मी एक सेकंद सुद्धा मागे-पुढे झालो असतो तर ते झुंबर माझ्या डोक्यावर कोसळलं असते. मी आणि माझी टीम अजूनही त्या धक्क्यातून सावरलो नाहीये. आणि मला टीमवर विश्वास होता की त्यांनी सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली असेल."दरम्यान, सध्या अमीनच्या या पोस्टवर अनेक जण कमेंट करत त्याला काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत.

Web Title: ar rahmans son ar ameen has narrowly escaped a accident