AR Rahmanच्या लेकीचा साखरपुडा, पाहा कोण आहे एआरचा होणारा जावई?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 11:29 IST2022-01-03T10:30:25+5:302022-01-03T11:29:05+5:30
AR Rahman Daughter Engagement: 29 डिसेंबरला खतीजाच्या बर्थ डेच्या दिवशीच एंगेजमेंंट झाली. पण चार दिवसानंतर खतीजाने ही बातमी जगजाहिर केली.

AR Rahmanच्या लेकीचा साखरपुडा, पाहा कोण आहे एआरचा होणारा जावई?
म्युझिक इंडस्ट्रीचा किंग ए. आर. रहमान ( AR Rahman ) याची लेक खतीजा (AR Rahman's daughter Khatija Rahman) पुन्हा चर्चेत आहे. होय, 2022 हे नवं वर्ष सुरू झालं आणि खतीजाने एंगेजमेंट झाल्याची गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली. एंगेजमेंटचा फोटो शेअर करत तिने ही माहिती दिली. 29 डिसेंबरला खतीजाच्या बर्थ डेच्या दिवशीच एंगेजमेंंट झाली. पण चार दिवसानंतर खतीजाने ही बातमी जगजाहिर केली.
खतीजाच्या होणाऱ्या पतीचं नाव रियासदीन शेख मोहम्मद (Riyasdeen Shaik Mohamed) आहे. खतीजाने रियासदीन व तिचा फोटो शेअर करताना एक लांबलचक पोस्टही लिहिली आहे.
तिने लिहिलं, ‘ बिझनेस मॅन व ऑडिओ इंजीनियर असणाऱ्या रियासदीन शेख मोहम्मदसोबत एंगेजमेंट झाल्याचं सांगताना मला फार आनंद होत आहे. 29 डिसेंबरला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी एंगेजमेंट झाली. जवळचे कुटुंबिय आणि प्रिय व्यक्ती यावेळी हजर होत्या.’
फोटोत खतीजा पिंक कलरच्या आऊटफिटमध्ये आहे. तिने त्याच रंगाचा मॅचिंग मास्कही घातला आहे. फोटोत तिचा चेहरा दिसत नाही. पण तिच्या डोळ्यांतील आनंद स्पष्ट वाचता येतो.
गतवर्षी खतीजा बुरख्यावरून अचानक चर्चेत आली होती. ‘बुरख्यात माझा जीव गुदमरतो,’असं टिष्ट्वट लेखिका तस्लिमा नसरीन यांनी केलं होतं. तस्लिमांच्या या टिष्ट्वटवर खतीजाने खरमरीत उत्तर दिलं होतं. ‘मला बुरख्यात पाहून तुम्हाला घुसमटल्यासारखं वाटत असेल तर कृपया तुम्ही शुद्ध हवेत जा, मोकळा श्वास घ्या. दुस-या महिलांना कमी लेखणं हा स्त्रीवादाचा अर्थ नाही,’ असं खतीजाने तस्लिमांना उद्देशून लिहिलं होतं.
ए. आर. रहमान यानेही यावर प्रतिक्रिया दिली होती. ‘बुरखा घालणं हा खतीजाचा स्वत:चा निर्णय आहे. तिने हा निर्णय घेण्याआधी आम्हा कुणालाही विचारलं नव्हतं. मला संधी मिळाली तर मलाही बुरखा घालायला आवडेल,’ असं तो म्हणाला होता.
ए. आर. रहमान आणि त्याची पत्नी सायरा बानो यांना एकूण तीन मुलं आहेत. खतीजा, रहीमा आणि ए. आर. अमीन. खतीजाने काही तमिळ चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांनी रजनीकांत यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या ‘एंथीरन के पुडिया मनिधा’ या गाण्यापासून आपला संगीत क्षेत्रातील प्रवास सुरु केला.