शिवाय-सैयशाचे ‘तेरे नाल इश्का’
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 14:28 IST2016-10-10T14:44:40+5:302016-10-17T14:28:28+5:30
अजय देवगनचा आगामी चित्रपट ‘शिवाय’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील ‘तेरे नाल इश्का’ हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. या कर्णप्रिय गाण्याची सुरुवात अभिनेत्री सैयशा सहगलच्या डॉयलॉगने होते.

शिवाय-सैयशाचे ‘तेरे नाल इश्का’
‘जिन लडकीयोंको अच्छे बाप मिलते है, उनकी तलाश उनकी तलाश बहुत लम्बी हो जाती है’ असा आवाज गाण्याच्या सुरुवातीला कानी पडतो. सैय्यद कादरी यांनी शब्दरचना केलेल्या या गीताला मिथूनने संगीतबद्ध केले असून गायक कैलाश खेर याने आपल्या आवाजाच साज यावर चढविला आहे. या गाण्यात अजय व सैयशा यांचा रोमांस दर्शविण्यात आला आहे. या गाण्यामध्ये दाखविण्यात आलेले लोकेशन्स देखणे आहेत. ‘तेरे नाल इश्का’ हे गाण्यातून अजय-सैयशाच्या प्रेमाला दर्शविण्यात आले आहे. संपूर्ण गाणे एका कथेच्या रूपात आहे. अजय देवगनचा शिवाय हा चित्रपट 28 आॅक्टोंबरला प्रदर्शित होत आहे.
चला तर पाहूया हे गाणे....
">http://