अपारशक्ती खुराणा व आकृतीचे मॅटर्निटी फोटोशूट, लवकरच होणार आईबाबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 17:16 IST2021-06-22T17:07:25+5:302021-06-22T17:16:08+5:30
आई तू बाबा मी होणार गं कुणी येणार गं...! बॉलिवूड अभिनेता अपारशक्ती खुराणाच्या घरी लवकरच एक छोटासा पाहुणा येणार आहे.

अपारशक्ती खुराणा व आकृतीचे मॅटर्निटी फोटोशूट, लवकरच होणार आईबाबा
बॉलिवूड अभिनेता अपारशक्ती खुराणाच्या (Aparshakti Khurana ) घरी लवकरच एक छोटासा पाहुणा येणार आहे. होय, अपारशक्ती लवकरच बाबा बनणार आहे. या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात त्याची पत्नी आकृती आहुजा (Aakriti Ahuja) बाळाला जन्म देणार आहे.साहजिकच पहिल्या बाळाच्या जन्माचा आनंद आहे. अपारशक्ती तर बाळाबद्दल खूप उत्सुक आहे. तूर्तास अपारशक्ती व आकृतीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा आहे. अपारशक्तीने या फोटोशूटचे काही फोटो त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केले आहेत.
या फोटोत आकृती पांढ-या रंगाच्या ड्रेसमध्ये बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसतेय. तर अपारशक्तीने पांढरा शर्ट व खाकी रंगाची पॅन्ट कॅरी केली आहे. फोटोत दोघेही कमालीचे सुंदर दिसत आहेत.
2014मध्ये अपारशक्ती ने त्याची मैत्रीण आकृती आहुजा हिच्याशी लग्न केले होते. अपारशक्तीच्या बाळाचे आगमन झाल्यानंतर आयुष्मान खुराणा ‘बडे पापा’ होणार आहे. बाळाच्या चाहुलीसाठी संपूर्ण खुराणा कुटुंब खूप उत्सुक आहे. लहान भाऊ किंवा बहीण येणार असल्याने आयुष्मानची मुलेही खूप खुश आहेत.
अभिनेता अपारशक्तीने आपल्या करिअरची सुरूवात आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटातून केली होती. या चित्रपटात अपारशक्तीची एक सहायक अभिनेत्याची भूमिका होती. यानंतर बद्रीनाथ की दुल्हनिया, स्त्री, लुका छुपी अशा अनेक चित्रपटांत तो दिसला.
भाऊ आयुष्मानसारखा अपारशक्ती देखील बहुगुणी अभिनेता आहे. तो केवळ अभिनयच नाही तर एक गायक देखील आहे. अपशक्ती आणि आकृती यांची भेट चंडीगडमध्ये झाली होती. दोघेही आधी एकमेकांचे चांगले मित्र बनले आणि मग त्यांनी एकमेकांना डेट केल्यानंतर 2014साली लग्न केले. आकृती ही ‘फेरी इव्हेंट्स’ नावाच्या कंपनीची संस्थापक आहे.