अनुष्का-विराट एकत्र राहाणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 17:32 IST2016-07-05T12:02:18+5:302016-07-05T17:32:18+5:30
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्यात पुन्हा सगळे आलबेल असल्याचे दिसून येत आहे. त्यांना सध्या अनेक ठिकाणी एकत्र पाहण्यात ...
.jpg)
अनुष्का-विराट एकत्र राहाणार?
व राट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्यात पुन्हा सगळे आलबेल असल्याचे दिसून येत आहे. त्यांना सध्या अनेक ठिकाणी एकत्र पाहण्यात येते. आता ते दोघे एकत्र राहाणार असल्याची चर्चा आहे. काहीच दिवसांत ते दोघे लिव्ह इनमध्ये राहायला सुरुवात करणार असल्याचे म्हटले जात आहे. विराटने मुंबईत काही महिन्यांपूर्वी एक भला मोठा फ्लॅट घेतला आहे. या फ्लॅटमध्ये ते दोघे एकत्र राहायला जाणार असल्याची चर्चा आहे. अनुष्का आणि विराटने त्यांचे नाते आता मीडियापासून दूर ठेवण्याचा विचार केला आहे. त्यामुळेच सध्या अनुष्का विराटसंबंधीत प्रश्नांचे उत्तर देणे टाळते. तसेच त्या दोघांचे फोटो एकत्र काढले जाऊ नयेत यासाठी ते प्रयत्न करत असतात.