‘साहो’मध्ये अनुष्का शेट्टी प्रभासबरोबर रोमान्स करणार काय? वाचा सविस्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2017 21:47 IST2017-07-26T16:16:12+5:302017-07-26T21:47:37+5:30

‘बाहुबली’मधील प्रभास अनुष्का शेट्टीची जोडी ‘साहो’मध्ये बघावयास मिळेल, अशी चर्चा रंगली होती. परंतु अनुष्काच्या नावावर अजूनही सस्पेन्स कायम आहे.

Anushka Shetty in 'Saoho' will do romance with Prabhas? Read detailed! | ‘साहो’मध्ये अनुष्का शेट्टी प्रभासबरोबर रोमान्स करणार काय? वाचा सविस्तर!

‘साहो’मध्ये अनुष्का शेट्टी प्रभासबरोबर रोमान्स करणार काय? वाचा सविस्तर!

ाहुबली’मध्ये मिळालेल्या अफाट यशानंतर अभिनेता प्रभास त्याच्या आगामी ‘साहो’साठी तयार आहे. तब्बल १५० कोटी रुपये बजेटच्या या चित्रपटात प्रभास एकदम हटके अंदाजात प्रेक्षकांसमोर जाणार आहे. खरं तर सध्या प्रभासला ‘बाहुबली’ या नावानेच ओळखले जाते. परंतु ‘साहो’मधील त्याचा अंदाज ‘बाहुबली’ची छबी बदलणारा असेल असा दावा केला जात आहे. दरम्यान, ‘साहो’मध्ये प्रभासची अभिनेत्री कोण असेल? यावर अजूनही सस्पेन्स कायम आहे. सुरुवातीला सोनम कपूर, कॅटरिना कैफ यांच्या नावाची चर्चा होती. त्यानंतर ‘बाहुबली’मधील प्रभास अनुष्का शेट्टीची जोडी याही चित्रपटात बघावयास मिळेल, अशी चर्चा रंगली होती. परंतु अनुष्काच्या नावावर अद्यापपर्यंत शिक्कामोर्तब झाला नसल्याने प्रभासच्या हिरोइनबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे. 

काही दिवसांपूर्वी अशी चर्चा रंगली होती, ‘साहो’मध्ये प्रभासबरोबर अनुष्काचे नाव निश्चित आहे. कारण या जोडीला प्रेक्षकांनी प्रचंड पसंत केले आहे. अनुष्काला अतिशय सेक्सी अवतारात चित्रपटात दाखविण्यात येणार असल्याचा मानसही निर्मात्यांनी बोलून दाखविला होता. विशेष म्हणजे अनुष्काची निवड करताना सोनम कपूरला डावलण्यात आल्याची चर्चा रंगली होती; मात्र मध्येच अशी बातमी समोर आली की, अनुष्काच्या वाढत्या वजनामुळे तिचा ‘साहो’मधून पत्ता कट करण्यात आला. आता आलेल्या माहितीनुसार पुन्हा एकदा अनुष्काचे नाव ‘साहो’साठी निश्चित करण्यात आले आहे; मात्र अनुष्काला जेव्हा ‘साहो’च्या निर्मात्यांनी नकार दिला होता, तेव्हा तिने एक तामिळ चित्रपट साइन केला होता. त्यामुळे ती पुन्हा ‘साहो’साठी होकार देणार काय? याविषयीचा सस्पेन्स मात्र कायम आहे.  



शिवाय ‘साहो’मध्ये प्रभासची लकी चार्म कोण असेल याविषयीदेखील त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. या चर्चांवरून एकच गोष्ट स्पष्ट होते की, आतापर्यंत चित्रपटासाठी कुठल्याही अभिनेत्रीला साइन केले नाही; मात्र आता पुन्हा एकदा अनुष्काचे नाव समोर येत असल्याने तिच्या नावावर शिक्कामोर्तब केला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, अनुष्का शेट्टीकडून कुठल्याही प्रकारचे आॅफिशियल स्टेटमेंट दिले गेले नसल्याने तिच्या नावावर अजूनही साशंकता आहे. जर अनुष्काने या चित्रपटाला होकार दिल्यास, प्रभास अनुष्काची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर बघणे प्रेक्षकांना आवडेल हे नक्की. 

दरम्यान, प्रभासच्या ‘साहो’ची शूटिंग सुरू करण्यात आली आहे. हा एक अ‍ॅक्शनपट असून, प्रभास व्यतिरिक्त चित्रपटात नील नितीन मुकेश आणि चंकी पाण्डेय या दोन स्टार्सचे नाव निश्चित करण्यात आले आहे. हा चित्रपट २०१८ मध्ये रिलीज केला जाणार आहे. ‘बाहुबली-२’ रिलीजप्रसंगीच या चित्रपटाचे टिझर रिलीज केले होते. 

Web Title: Anushka Shetty in 'Saoho' will do romance with Prabhas? Read detailed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.