​अनुष्का शेट्टीने नाकारली करण जोहरची ‘आॅफर’! वाचा काय आहे कारण!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2017 14:08 IST2017-11-12T08:38:43+5:302017-11-12T14:08:43+5:30

‘बाहुबली2’नंतर प्रभासची मागणी वधारली आहे. केवळ प्रभासचं नाही तर ‘बाहुबली’ची देवसेना अनुष्का शेट्टी हिची मागणीही वाढली आहे. प्रत्येक दिग्दर्शक ...

Anushka Shetty rejects Johar's offer! Read what is the reason !! | ​अनुष्का शेट्टीने नाकारली करण जोहरची ‘आॅफर’! वाचा काय आहे कारण!!

​अनुष्का शेट्टीने नाकारली करण जोहरची ‘आॅफर’! वाचा काय आहे कारण!!

ाहुबली2’नंतर प्रभासची मागणी वधारली आहे. केवळ प्रभासचं नाही तर ‘बाहुबली’ची देवसेना अनुष्का शेट्टी हिची मागणीही वाढली आहे. प्रत्येक दिग्दर्शक निर्माता प्रभास, अनुष्कांना यांना आपल्या चित्रपटात घेऊ इच्छित आहे. पण या दोघांची फी इतकी की, कुणालाही त्यांना साईन करण्याची हिंमत होत नाही. दुस-या कुणाचे सोडाच पण खुद्द करण जोहरही इतकी फी देण्यास असमर्थता दर्शवली आहे. करण जोहरला प्रभाससोबत चित्रपट करायचा होता. पण प्रभासने इतका मोठा आकडा सांगितला की, करणच्या भुवया उंचावल्या. मग काय प्रभाससोबत चित्रपट बनवण्याचा विचारचं करणला सोडून द्यावा लागला. ‘देवसेना’ अनुष्काबद्दलही करणसोबत असेच काही घडले. टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, प्रभास नाही तर किमान अनुष्काने तरी आपल्या चित्रपटात काम करावे, असे करणचे मत होते.  करणने लगेच अनुष्काशी संपर्क साधला. पण अनुष्काने सुरूवातीलाच चित्रपटाच्या कथेबद्दल नाक मुरडले. करणने मानमिनत्या केल्यात. तेव्हा कुठे अनुष्का मानली. पण यानंतर तिने मानधनाचा इतका मोठा आकडा समोर केला की, करणलाच घाम सुटला. मग काय, प्रभास पाठोपाठ अनुष्कासोबत काम करण्याचा इरादाही करणला सोडून द्यावा लागला. आता बॉलिवूडचा कुठला निर्माता प्रभास व अनुष्काला म्हणेल त्या रकमेत साईन करतो, हे पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे. खरे सांगायचे तर अनुष्काने बॉलिवूड चित्रपटाला नकार देण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही अनुष्काने इम्तियाज अलीच्या ‘तमाशा’ला नकार दिला होता. तिच्या नकारानंतर या चित्रपटात दीपिका पादुकोणची वर्णी लागली होती. याशिवाय अजय देवगणचा ‘सिंघम’ आणि ‘गोलमाल’ सारख्या चित्रपटांनाही अनुष्काने ‘ना’ म्हटले आहे.
लवकरच अनुष्काचा ‘भागमती’ हा चित्रपट येतो आहे. गत ७ नोव्हेंबरला आपल्या वाढदिवशी अनुष्काने या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला होता. हातात रक्ताने माखलेली हातोडा अशा अवतारात अनुष्का यात दिसली होती.

ALSO READ: ​‘देवसेना’ अन् ‘अवंतिका’ पुन्हा येणार का एकत्र?

‘बाहुबली2’नंतर अनुष्का व प्रभासच्या लिंकअपच्या बातम्यांनी प्रचंड जोर धरला आहे. येत्या डिसेंबरमध्ये दोघेही लग्न करणार, अशी बातमी आहे. अर्थात प्रभास व अनुष्का दोघांनीही या बातम्या वेळोवेळी नाकारल्या आहेत. आम्ही कुठल्याही रिलेशनशिपमध्ये नाही. आम्ही केवळ चांगले मित्र आहोत, असे दोघेही सांगत आले आहेत. 

Web Title: Anushka Shetty rejects Johar's offer! Read what is the reason !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.