अनुष्का शर्माच्या ‘परी’चे दुसरे पोस्टर आले!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2017 11:48 IST2017-07-10T06:18:15+5:302017-07-10T11:48:15+5:30
अनुष्का शर्मा निर्मित ‘परी’ या चित्रपटाचे दुसरे पोस्टर आज रिलीज झाले. यात अनुष्का जमिनीवर पहुडलेली दिसतेयं. तिच्या एका कानात ...

अनुष्का शर्माच्या ‘परी’चे दुसरे पोस्टर आले!!
अ ुष्का शर्मा निर्मित ‘परी’ या चित्रपटाचे दुसरे पोस्टर आज रिलीज झाले. यात अनुष्का जमिनीवर पहुडलेली दिसतेयं. तिच्या एका कानात ईअर प्लग आहे. दोन्ही हात वर आहेत, जणू ती कुणाला साद घालतेय. तिच्या पायाला कुठलीशी जखम आहे. पुढील वर्षी ९ फेबु्रवारीला हा चित्रपट रिलीज होणार आहे.
![]()
या पोस्टरमध्ये ‘परी’बद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. यापूर्वीच्या पहिल्या पोस्टरमध्येही अनुष्काचे काहीसे भयावह रूप दिसले होते. पहिल्या नजरेत ही अनुष्काच, हेही ते पोस्टर पाहून ओळखू शकले नव्हते. तूर्तास या पोस्टरवरून हा एक डार्क ड्रामा असावा, असा अंदाज बांधला जात आहे. कारण अनुष्का व तिची टीम या चित्रपटाबद्दल पूर्णत: सन्पेन्स ठेवून आहे.
अनुष्का या चित्रपटाची को-प्रोड्यूसर आहे. अनुष्का तिचा भाऊ करनेश शमासोबत मिळून हा चित्रपट बनवते आहे. प्रोसित रॉय या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. बंगाली स्टार परमब्रता चॅटर्जी यात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. यापूर्वी अनुष्का निर्मित ‘एनएच१०’ आणि ‘फिल्लोरी’ हे दोन चित्रपट आपण पाहिलेत. आता अनुष्काच्या होम प्रॉडक्शनचा तिसरा सिनेमा आपल्या भेटीस येणार आहे. ‘एनएच१०’ आणि ‘फिल्लोरी’ या दोन्ही चित्रपटांना पे्रक्षक व समीक्षकांची दाद मिळाली. आता ‘परी’कडूनही प्रेक्षकांना बºयाच अपेक्षा आहेत. अनुष्का या अपेक्षांवर किती खरी उतरते तेही आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे. तूर्तास अनुष्का ‘परी’च्या शूटींगसोबतच ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यात अनुष्का शाहरूख खानसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. याशिवाय संजय दत्तच्या बायोपिकमध्येही अनुष्का एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारतेय. आनंद एल रायच्या पुढील चित्रपटात ती शाहरूख खानसोबत दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही.
ALSO READ : ‘या’ चित्रपटात जमणार वरूण धवन -अनुष्का शर्माची जोडी!