धोनीची फटकेबाजी बघून असा उडाला अनुष्का शर्माच्या चेहºयावरील रंग, पाहा व्हिडीओ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2018 16:12 IST2018-04-26T10:32:13+5:302018-04-26T16:12:00+5:30
आयपीएल २०१८ मध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात काल अतिशय चुरशीचा सामना खेळण्यात आला. चेन्नई सुपर ...

धोनीची फटकेबाजी बघून असा उडाला अनुष्का शर्माच्या चेहºयावरील रंग, पाहा व्हिडीओ!
आ पीएल २०१८ मध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात काल अतिशय चुरशीचा सामना खेळण्यात आला. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एम. एस. धोनीने ७० धावांची तुफानी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. धोनीचा हा अवतार बघून चाहत्यांचे चांगलीच करमणूक झाली, तर काहींच्या चेहºयावरील रंगच उडून गेला. खरं तर हा सामना धोनी विरुद्ध विराट कोहली असा रंगला होता. त्यामुळे यामध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. एकीकडे विराटच्या संघाचा चिअरअप करण्यासाठी अभिनेत्री अनुष्का शर्माने मैदानात हजेरी लावली होती, तर दुसरीकडे धोनीची पत्नी साक्षी त्याच्या टीमचे समर्थन करताना दिसली. सामना सुरू होण्याअगोदर जेव्हा अनुष्का स्टेडियममध्ये पोहोचली तेव्हा तिच्या चेहºयावर कमालीची उत्सुकता दिसून आली. परंतु धोनीने चौकार-षटकारांची बरसात करताच तिच्या चेहºयावरील हा उत्साह निरुत्साहामध्ये बदलत गेला.
याबाबतचा अनुष्काचा एक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. एका व्हिडीओमध्ये अनुष्का आरसीबीचे समर्थन करताना जोरजोरात टाळ्या वाजविताना दिसत आहे, तर दुसरा व्हिडीओ हा सामना संपण्याच्या काही वेळापूर्वीचा आहे. ज्यामध्ये अनुष्काच्या चेहºयावरील रंग उडताना स्पष्टपणे दिसत आहे. अनुष्काच्या या व्हिडीओवरून नेटिझन्समध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. शिवाय तिला ट्रोलही केले जात आहे. दरम्यान, टॉस जिंकल्यानंतर धोनीने गोलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनेदेखील तुफान फलंदाजी करीत सीएसकेसमोर २०५ धावांचे विशाल लक्ष ठेवले. अशात अखेरच्या काही षटकांमध्ये धोनीने संपूर्ण सामन्याचे सूत्र हाती घेत संघासाठी विजयश्री खेचून आणली. अखेरीस जोरदार षटकार ठोकून त्याने संघाला विजय मिळवून दिला.
![]()
![]()
![]()
दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला हा सामना जिंकणे अत्यावश्यक होते. कारण गुणतालिकेत ते सहाव्या स्थानी असून, हा सामना जिंकला असता तर त्यांच्या गुणात वाढ झाली असती. परंतु सीएसकेने सामना जिंकून गुणतालिकेत सर्वोच्च स्थान मिळविले आहे. आता पुढच्या सामन्यांमध्ये आरसीबीला चांगले प्रदर्शन करावे लागणार आहे.
@AnushkaSharma At M. Chinnaswamy Stadium to support @imVkohli & @RCBTweets ❤#AnushkaSharma#RCB#RCBvCSKpic.twitter.com/dSpd4R9g4D— Virushka Updates (@VirushkaUpdate_) April 25, 2018