2018 मध्ये या चित्रपटांमध्ये दिसणार अनुष्का शर्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 15:12 IST2017-12-21T09:42:23+5:302017-12-21T15:12:23+5:30

 गेल्या काही दिवसांपासून आपण सतत अनुष्का शर्माच्या लग्नाशी संबंधीत चर्चा ऐकतो आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला 2018 मध्ये अनुष्का ...

Anushka Sharma will appear in these films in 2018 | 2018 मध्ये या चित्रपटांमध्ये दिसणार अनुष्का शर्मा

2018 मध्ये या चित्रपटांमध्ये दिसणार अनुष्का शर्मा

 
ेल्या काही दिवसांपासून आपण सतत अनुष्का शर्माच्या लग्नाशी संबंधीत चर्चा ऐकतो आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला 2018 मध्ये अनुष्का येणाऱ्या चित्रपटांविषयी माहिती देणार आहोत. अनुष्काच्या चित्रपटांच्या लिस्टवर नजर टाकली तर असे वाटते काही वेगळ्या भूमिकांमध्ये अनुष्का प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  

1 परी (9 फेब्रुवारी 2018) 
अनुष्का शर्माचा आगामी चित्रपट परी हा एक सुपरनॅचुरल थ्रिलर असणार आहे. काही दिवसांआधीच  या चित्रपटाचा पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. जो प्रेक्षकांना आवडला आहे. या चित्रपटाची निर्मिती स्वत: अनुष्का शर्मा करते आहे तर याचे दिग्दर्शन प्रोसित रॉय करणार आहे.  

2. सुई धागा (2 ऑक्टोबर 2018) 
महात्मा गांधी यांच्या मेड इन इंडिया या कॉन्सेप्टवर आधारित चित्रपट अनुष्का शर्मा आणि वरुण धवन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे यात अऩुष्का आणि विराट पहिल्यांदा एकत्र दिसणार आहे. त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट बघतायेत. वरुण धवनने या चित्रपटातील आपल्या भूमिकेवरुन पडदा उचलला आहे. ज्यात तो कपडे शिवताना दिसतो आहे. या फोटोवरुन अंदाज लावता येऊ शकतो की यात वरुण टेलरची भूमिका साकारणार आहे. यात अनुष्का कोणती भूमिका साकारणार हे अद्याप कळू शकलेले नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन शरत कटारिया करणार आहे.    

3. आनंद एल राय यांचा चित्रपट  (21 डिसेंबर 2018) 
शाहरुख खान, कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्मा स्टारर आनंद एल राय यांच्या चित्रपटाचे नाव अजून ठरलेले नाही. मात्र तरीही या चित्रपटाची खूप चर्चा आहे. हा चित्रपट बिग बजेट असणार आहे. यात शाहरुख खान बौने व्यक्तिची भूमिका साकारणार आहे.        

आम्ही सांगितल्या प्रमाणे अनुष्का 2018मध्ये वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसणार आहे. सध्या अनुष्का अनुष्का सासरी आहे. होय, विराटच्या कुटुंबासोबत दिल्लीत ती वेळ घालवतेय. २६ डिसेंबरला मुंबईत आणखी दुसरी रिसेप्शन पार्टी रंगणार आहे. या रिसेप्शनची तयारी सुरु झाली आहे. 

Web Title: Anushka Sharma will appear in these films in 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.