अनुष्का शर्माने विराट कोहलीसह पाहिला 'धुरंधर २', म्हणाली- "जवळपास ४ तास मी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 09:24 IST2026-04-07T09:16:52+5:302026-04-07T09:24:57+5:30
सध्या 'धुरंधर २' सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. अशातच अभिनेत्री अनुष्का शर्माने पती विराट कोहलीसह रणवीरचा 'धुरंधर २' पाहिला. हा सिनेमा पाहिल्यानंतर अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे.

अनुष्का शर्माने विराट कोहलीसह पाहिला 'धुरंधर २', म्हणाली- "जवळपास ४ तास मी..."
सध्या 'धुरंधर २' सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. रणवीर सिंग, आर. माधवन, अर्जुन रामपाल या कलाकारांची तगडी भूमिका असलेला 'धुरंधर २' बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवनवीन विक्रम मोडत आहे. अशातच अभिनेत्री अनुष्का शर्माने पती विराट कोहलीसह आदित्य धर दिग्दर्शित रणवीर सिंगचा 'धुरंधर २' पाहिला. हा सिनेमा पाहिल्यानंतर अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे.
अनुष्काने इन्स्टाग्राम स्टोरीवर दिग्दर्शक आदित्य धर आणि चित्रपटातील कलाकारांसाठी एक मोठी पोस्ट लिहिली. तिने म्हटले, "आदित्य धर, तुम्ही काय शानदार चित्रपट बनवला आहे! जवळपास ४ तास लांबीचा चित्रपट बनवण्यासाठी खूप मोठ्या आत्मविश्वासाची गरज असते. हा चित्रपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. तुम्ही एक अत्यंत कल्पक आणि आत्मविश्वासू चित्रपट निर्माते-दिग्दर्शक आहात."
अनुष्काने सर्व कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक केलं, विशेषतः रणवीर सिंबद्दल तिने लिहिले की, "रणवीर तू तुझी भूमिका अत्यंत चोखपणे साकारली आहेस. तुझ्या परफॉर्मन्समध्ये नाव ठेवायला अजिबात जागा नाही. तू दमदार अभिनय केला आहेस." याशिवाय आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि राकेश बेदी यांच्या अभिनयाने चित्रपट अधिक समृद्ध झाल्याचे तिने नमूद केले.
विराट कोहलीची प्रतिक्रिया
'धुरंधर २' सिनेमा पाहिल्यानंतर विराटने देखील कौतुकाचा वर्षाव केला. विराटने लिहिले, "आज मी हा चित्रपट पाहिला आणि मी खात्रीने सांगू शकतो की, भारतात बनलेलं असं 'सिनेमॅटिक प्रेझेंटेशन' मी याआधी कधीच पाहिलं नव्हतं. या चित्रपटाने मनातील सर्व भावनांना साद घातली आणि जवळपास चार तास मी जागेवरून हललो नाही."
आदित्य धरचे कौतुक करताना विराटने पुढे म्हटले, "तुमची प्रतिभा आणि जिद्द तुमच्या कलाकृतीतून स्पष्टपणे दिसून येते. तुम्हाला सलाम! तुम्ही खरोखरच जीनियस आहात." रणवीर सिंगबद्दल विराटने खास टिप्पणी केली की, "या चित्रपटानंतर तू कलाक्षेत्रात एक वेगळेच स्थान गाठले आहे. तुझा अभिनय लाजवाब आणि खरोखरच कमाल होता.", अशाप्रकारे विराट आणि अनुष्का 'धुरंधर २'चे चाहते झाले आहेत, हे स्पष्ट दिसतंय.