​आॅस्कर पुरस्कार सोहळ्याला हजर होती अनुष्का शर्मा... हे घ्या पुरावे!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2017 15:01 IST2017-03-03T09:23:08+5:302017-03-03T15:01:08+5:30

लॉस एंजिल्स येथे नुकत्याच रंगलेल्या आॅस्कर पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिची उपस्थिती सगळ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली होती. ...

Anushka Sharma was present at the Oscars Award ceremony ... proof of this !! | ​आॅस्कर पुरस्कार सोहळ्याला हजर होती अनुष्का शर्मा... हे घ्या पुरावे!!

​आॅस्कर पुरस्कार सोहळ्याला हजर होती अनुष्का शर्मा... हे घ्या पुरावे!!

स एंजिल्स येथे नुकत्याच रंगलेल्या आॅस्कर पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिची उपस्थिती सगळ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली होती. प्रियांका चोप्राप्रमाणेच दीपिका पादुकोणही या सोहळ्याला पोहोचली होती. पण ती आॅस्करच्या मुख्य सोहळ्यात कुठे दिसली नाही. पण प्रियांका व दीपिकाच नाही तर अनुष्का शर्मा सुद्धा या सोहळ्याला हजर होती. अर्थात तिच्याकडे कुणाचेच लक्ष गेले नाही. नाही ना विश्वास बसत?  तुम्हाला सहजी विश्वास बसणार नाही, हे आम्हाला ठाऊक होतेच. म्हणून तर आम्ही तुमच्यासाठी पुरावे घेऊन आलोत. 





खुद्द अनुष्कानेच हे पुरावे दिले आहेत. तिच्या सोशल मीडियावर हा सोहळ्याचे काही फोटो आहेत. त्यात अनुष्का अगदी स्पष्ट दिसतेय. होय, लॉस एंजिल्सच्या डॉल्बी थिएटरमध्ये अनुष्का हजर आहे.  पण काय? या फोटोत अनुष्का ‘फिल्लोरी’ लूकमध्ये आहे? पण तीच तर गंमत आहे. अनुष्काचे हे फोटो म्हणजे ‘फिल्लोरी’च्या प्रमोशनचा भाग आहे. ‘फिल्लोरी’मध्ये अनुष्का एका ग्लॅमरस भूताची भूमिका साकारतेयं, हे तर तुम्हाला ठाऊक आहेच. ‘फिल्लोरी’तील अनुष्काचे हेच भूत आॅस्कर पुरस्कार सोहळ्यात पोहोचले होते. आले ना लक्षात!!



 आॅस्कर सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाची घोषणा करताना गोंधळ उडाला. आॅस्करच्या स्टेजवर हा गोंधळ सुरु असतानाचा नेमका एक फोटो ‘फिल्लोरी’च्या प्रमोशनसाठी वापरण्यात आला आहे. या फोटोत अनुष्काचा फोटो फोटोशॉपच्या माध्यमातून एडिट करून लावण्यात आला आहे. हा फोटो अनुष्काने तिच्या सोशल अकाऊंटवरून शेअर केला आहे. आता अनुष्का आॅस्कर सोहळ्यात कशी पोहोचली हे तुम्हाला कळले असेलच. होय, अनुष्का नाही तर ‘फिल्लोरी’तील तिचे भूत आॅस्कर सोहळ्याला गेले होते. आहे ना गंमत!

Web Title: Anushka Sharma was present at the Oscars Award ceremony ... proof of this !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.