अनुष्का शर्माची साडी तयार करायला लागले तब्बल इतके महिने

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2017 10:54 IST2017-12-30T05:24:09+5:302017-12-30T10:54:09+5:30

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया फक्त विराट कोहली आणि अनुष्का शर्मांच्या लग्नाच्या बातम्यांनीच भरले आहे. 11 डिसेंबराल दोघांनी इटलीमध्ये ...

Anushka Sharma started making sari for so many months | अनुष्का शर्माची साडी तयार करायला लागले तब्बल इतके महिने

अनुष्का शर्माची साडी तयार करायला लागले तब्बल इतके महिने

ल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया फक्त विराट कोहली आणि अनुष्का शर्मांच्या लग्नाच्या बातम्यांनीच भरले आहे. 11 डिसेंबराल दोघांनी इटलीमध्ये जाऊन गुपचूप विवाह केला. यावेळी त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे काही मित्रच उपस्थित होते. इटलीतल्या टस्कनी इथल्या बोर्गो फिनोखिएतो Borgo Finocchieto या रिसॉर्टमध्ये हा विवाहसोहळा पार पडला.  त्यानंतर भारतात परतल्यावर त्यांनी आधी दिल्लीत आणि मग मुंबईत ग्रँड रिप्सेशन दिले. अऩुष्काच्या लग्नाच्या लेेंहग्यापासून त्यांच्या कानातल्यापर्यंत सगळ्यांच गोष्टींची चर्चा झाली. दिल्लीत रिसेप्शनला अनुष्का लाल रंगाची साडी नेसली होती. हातात लाल रंगाचा चुडा घातला होता. अऩुष्काच्या या बनारीस सिल्क साडीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं. पण ही साडी तयार करायला खूप मेहनत घ्यावी लागली आहे.  गेले सहा महिन्यांपासून अनुष्काची ही साडी तयार करण्यात येत होती. अऩुष्काची ही खास साडी बनारस होऊन तयार करुन आली होती. एक रिपोर्टनुसार तीन कारागिरांनी ही साडी विणली होती.  या साडीला सोन्याची जर होती. ही साडी हाताने बनवण्यात आली असून ही साडी बनवताना सोन्याचा वापर करण्यात आला होता. या साडीची किंमत पाच लाखांहून देखील जास्त आहे साडी विणताना तिन्ही कारागिरांची उपस्थिती आवश्यक असे. साडी विक्रेत्याच्या मते, अशा पद्धतीची साडी विणताना एखादा कारागीर जरी गरैहजर राहीला तरी काम पुर्ण होऊ शकत नाही. त्या दिवशी कारखाना बंद ठेवावा लागतो. तसेच तिने घातलेली दागिने देखील प्रचंड महाग होते. 


ALSO READ :  OMG!! ​अनुष्का शर्माने रिसेप्शनमध्येही केली दीपिका पादुकोणची ‘कॉपी’!

ही साडी विणतांना त्या कारागिरांना आपण ती अनुष्कासाठी विणतो आहे याची कल्पना नव्हती. अनुष्काच्या रिसेप्शनचे बातम्या टीव्हीवर बघितल्यावर त्यांना ही गोष्ट माहित झाली. साडी प्रमाणे अनुष्काने घातलेले झुमकेही महागडे होते. झुमक्याची किंमत ही २५-३० लाख रूपये असल्याचे म्हटले जाते. मुंबईतल्या रिसेप्शनला ही बॉलिवूडचे कलाकार आणि क्रिकेट जगतातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. मुंबईतले रिसेप्शन आटपल्यानंतर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ते साऊथ आफ्रिकेला रवाना झाले आहेत.

Web Title: Anushka Sharma started making sari for so many months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.