Virat Anushka First Wedding Anniversary : अनुष्का शर्माने शेअर केला खास व्हिडिओ, विराटही झाला रोमॅन्टिक!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 12:52 IST2018-12-11T12:50:13+5:302018-12-11T12:52:17+5:30
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली यांच्या लग्नाला आज (११ डिसेंबर) एक वर्ष पूर्ण झाले. वर्षभरापूर्वी आजच्याच दिवशी विराट व अनुष्का यांनी इटलीत विवाहबद्ध झाले होते.

Virat Anushka First Wedding Anniversary : अनुष्का शर्माने शेअर केला खास व्हिडिओ, विराटही झाला रोमॅन्टिक!!
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली यांच्या लग्नाला आज (११ डिसेंबर) एक वर्ष पूर्ण झाले. वर्षभरापूर्वी आजच्याच दिवशी विराट व अनुष्का यांनी इटलीत विवाहबद्ध झाले होते. आज दोघेही लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहेत. लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी अनुष्काने लग्नाचा एक सुंदर व्हिडिओ पोस्ट केला आहे. दोन मिनिटांच्या या व्हिडिओ अनुष्का व विराट कमालीचे सुंदर दिसत आहेत. लग्नमंडपातील त्यांच्या चेहºयावरचा आनंदही पाहण्यासारखा आहे.
एक चांगला आणि सच्च्या मनाचा व्यक्ती तुमचा जोडीदार होतो यापेक्षा दुसरे कुठलेहीं सुख नाही. माझा बेस्ट फ्रेन्ड, माझा सोलमेट...माईन फॉरेव्हर..., असे म्हणत अनुष्काला विराटला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
तर, मला अजूनही विश्वास बसत नाहिये की आमच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. जणू सगळंच कालपरवाच घडले आहे,असे लिहित विराटन्से लग्नातल्या काही खास क्षणाचे फोटो शेअर करत अनुष्काला शुभेच्छा दिल्या आहेत.
तूर्तास विराट कोहली आॅस्ट्रेलियात आपल्या मॅचमध्ये बिझी आहे. लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अनुष्काही याठिकाणी पोहोचली आहे. यासाठी तिने ‘झिरो’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमधून छोटा ब्रेक घेतला आहे.
विराट व अनुष्काने ११ डिसेंबर २०१७ रोजी लग्न केले. या लग्नाला केवळ अनुष्का व विराटचे कुटुंबीय व अतिशय जवळचे मित्रमंडळीचं तेवढे उपस्थित होते. लग्नानंतर दोघांनीही मुंबईत एक रिसेप्शन दिले होते.