Anushka Sharma's Childhood Pictures: अनुष्का शर्माचे हे बालपणीचे फोटो पाहून तुम्ही देखील म्हणाल, सो क्यूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 17:54 IST2019-09-13T17:54:00+5:302019-09-13T17:54:47+5:30
अनुष्काने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे बालपणीचे तीन फोटो पोस्ट केले असून या फोटोत ती खूपच छान दिसत आहे.

Anushka Sharma's Childhood Pictures: अनुष्का शर्माचे हे बालपणीचे फोटो पाहून तुम्ही देखील म्हणाल, सो क्यूट
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा भलेही चित्रपटांपासून दूर असली तरी देखील ती सोशल मीडियावर सक्रिय असते. अनुष्का तिच्या चाहत्यांना प्रत्येक गोष्टींचे अपडेट देत असते. अनुष्का शर्माने नुकताच तिच्या बालपणीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच छान दिसत असल्याचे तिच्या फॅन्सचे म्हणणे आहे. या फोटोची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
अनुष्काने शेअर केलेल्या या फोटोत अनुष्का शांतपणे बसलेली दिसत असून तिने लाल रंगाचा स्वेटर घातलेला आहे. तसेच पिवळ्या रंगाचा हेअर बँड लावला आहे. तिने या फोटोसोबत लिटल मी असे लिहिले असून या फोटोत ती खूपच क्यूट दिसत असल्याचे तिच्या चाहत्यांचे म्हणणे आहे.
अनुष्काने या फोटोसोबतच तिचा अगदी लहान असतानाचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत चिमुरड्या अनुष्काच्या चेहऱ्यावर गोड हास्य पाहायला मिळत आहे. हा फोटो पाहून अनुष्का बालपणी देखील तितकीच सुंदर दिसत होती असे तिचे फॅन्स म्हणत आहेत.
तर तिसऱ्या फोटोत अनुष्का काहीतरी खाताना आपल्याला दिसत असून तिच्या या फोटोवर दिया मिर्झाने सो स्वीट अशी कमेंट केली आहे.
अनुष्का नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अनुष्का शर्माच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती मागील वर्षी डिसेंबरमध्ये शाहरूख खानच्या झिरो चित्रपटात झळकली होती. या चित्रपटानंतर अनुष्का बॉलिवूडपासून दूर आहे. मात्र लवकरच ती वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
नुकतेच फिरोज शाह कोटला स्टेडियमचे नाव बदलून दिवगंत अरुण जेटली स्टेडियम असे करण्यात आले. याच सोहळ्यात स्टेडियममधील एका स्टॅण्डला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे नाव देण्यात आहे. या सोहळ्याला विराटसह पत्नी अनुष्का शर्माही उपस्थित होती. या सोहळ्यात कोहलीच्या नावाची घोषणा होताच अनुष्का भावुक झाली आणि तिने त्याचा हात हातात घेतला. सर्वांची नजर चुकवून अनुष्काने हळूच कोहलीच्या हाताला किस केले. पण अनुष्का आणि कोहलीचा हा रोमँटिक क्षण कॅमेरात कैद झाला आणि सोशल मीडियावर व्हायरलही झाला. अनुष्का आणि विराट यांचे कपल त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडतं.