अनुष्का शर्मा म्हणते ‘मी फेमिनिस्ट’
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2017 14:56 IST2017-02-26T09:26:07+5:302017-02-26T14:56:07+5:30
अनिता अदजानिया हिने आपल्या सोशम मीडिया नेटवर्किंग इन्स्टाग्राम अकाऊंटवरून वोगच्या कव्हरपेजचा फोटो शेअर केला आहे.
.jpg)
अनुष्का शर्मा म्हणते ‘मी फेमिनिस्ट’
ब लिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासाठी चांगले दिवस आहेत असेच म्हणावे लागेल. येत्या काही दिवसांत तिची निर्मिती व मुख्य भूमिका असलेला आगामी फिलौरी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. मात्र, सध्या अनुष्का शर्मा फेमिनिस्ट असल्यामुळे चर्चेत आली आहे. वोग इंडिया या नियतकालिकाच्या कव्हरपेजवर अनुष्काचा प्रो फेमिनिस्ट फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे.
महिलांवर आधारित ‘लिपिस्टिक अंडर माय बुर्का’ या चित्रपटामुळे ‘स्त्री’ हा विषय बॉलिवूडमध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहेलाज निहलानी यांनी या चित्रपटात दाखविण्यात आलेल्या स्त्रीयांच्या वागणुकीचा मुद्दा उपस्थित करून या चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे. तर दुसरीकडे कला स्वातंत्र्याचा मुद्दा धरून बॉलिवूडने पहेलाज निहलानी यांचा विरोध केला आहे. यामुळे हा वाद चांगलाच रंगला असताना अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचा वोगच्या कव्हरपेजचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.
![]()
आगामी फिलौरी या चित्रपटातील अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचा ‘वोग’च्या कव्हरपेजवरील फोटोमधून अनोखा अंदाज समोर आला आहे. वोगसाठी केलेल्या फोटोशेसनमध्ये ‘आपण सर्वांनी स्त्रीवादी (फेमिनिस्ट ) असावे’ असे स्लोगन असलेले टॉप घातला आहे. तर तिचा पारदर्शक मिडीमध्ये अनुष्का आकर्षक दिसते आहे. स्टायलीश अनिता अदजानिया हिने अनुष्कासाठी हा ड्रेस डिझाईन केला आहे. वोगच्या या अंकातील कव्हरस्टोरी अनुष्का शर्मावर असून ‘अनुष्का शर्माला एफ-वर्ल्डची भिती वाटत नाही’ असे शिर्षक देण्यात आले आहे. अनिता अदजानिया हिने आपल्या सोशम मीडिया नेटवर्किंग इन्स्टाग्राम अकाऊंटवरून वोगच्या कव्हरपेजचा फोटो शेअर केला आहे.
अभिनेत्री अनुष्का शर्माचा फिलौरी व स्वरा भास्कर हिची मुख्य भूमिका असलेला अनारकली आॅफ आरा हे दोन्ही महिला प्रधान चित्रपट एकाच दिवशी २४ मार्चला रिलीज होत आहेत. दोन अभिनेत्रींच्या बॉक्स आॅफिस युद्धात कोण बाजी मारणार हे आगामी काळच सांगेल.
">http://