Anushka Sharma: अनुष्का शर्मानं टॅक्स प्रकरणात थेट कोर्टाचा दरवाजा ठोठावला, नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 20:38 IST2023-01-12T20:37:30+5:302023-01-12T20:38:32+5:30
बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने विक्रीकर विभागाच्या एका प्रकरणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Anushka Sharma: अनुष्का शर्मानं टॅक्स प्रकरणात थेट कोर्टाचा दरवाजा ठोठावला, नेमकं प्रकरण काय?
बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने विक्रीकर विभागाच्या एका प्रकरणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. विक्री विभागाच्या नोटिशीला अनुष्कानं आव्हान दिलं आहे. कराची नोटीस योग्य नसल्याचं तिचं मत आहे. विक्रीकर उपायुक्तांनी अनुष्काच्या विरोधात दोन आदेश पारित केले, त्याविरोधात अनुष्काने आता न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायमूर्ती नितीन जामदार आणि अभय आहुजा यांनी या प्रकरणावर सुनावणी केली. त्याच्या अपीलला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ फेब्रुवारीला होणार आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
विक्रीकर विभागाने अनुष्काविरुद्ध २०१२-१३ आणि २०१३-२०१४ या वर्षांसाठी कर वसुलीसाठी नोटीस बजावली होती. अनुष्काने विक्रीकर विभागाचा आदेश रद्द करण्याची विनंती केली आहे. हा कर कलाकार म्हणून त्यांच्यावर लादला जावा, असं त्यांचे म्हणणे आहे. अधिकाऱ्यांनी एक कलाकार किंवा अभिनेत्याच्या तुलनेत जास्त लावला गेला असल्याचं अनुष्काचं म्हणणं आहे.
न्यायालयानं फटकारलं
अनुष्का शर्मानं २०१२ ते २०१६ पर्यंत ४ याचिका दाखल केल्या आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये उच्च न्यायालयानं त्यांना फटकारलं होतं. याचिका दाखल करण्यासाठी अनुष्कानं कर सल्लागाराची मदत घेतली होती, त्यावर सुनावणी करण्यास न्यायालयानं नकार दिला. संबंधित व्यक्ती स्वत: याचिका का दाखल करू शकत नाही, असं न्यायालयानं म्हटलं होतं.