विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 19:06 IST2025-05-13T19:06:12+5:302025-05-13T19:06:50+5:30
Anushka Sharma And Virat Kohli : अनुष्का शर्मा आणि विराट कोहली प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात गेले होते. तिथे अनुष्का शर्मा भावुक झालेली पाहायला मिळाली.

विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) नुकतेच प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात गेले होते. यादरम्यान दोघेही खूप भावनिक दिसत होते. अनुष्का आणि विराटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. व्हिडीओमध्ये प्रेमानंद महाराज (Premanand Maharaj) यांचे प्रवचन ऐकून अनुष्का शर्मा खूप भावनिक झाली आणि रडू लागली.
विराट कोहलीने मंगळवारी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर अनुष्का आणि विराट वृंदावनमधील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात गेले होते. आश्रमात पोहोचताच प्रेमानंद महाराजांनी विचारले की तुम्ही आनंदी आहात का? यावर विराट म्हणाला, मी ठीक आहे. यानंतर प्रेमानंद महाराजांनी परमेश्वराच्या नियमाबद्दल सांगितले. ते म्हणाले की, जेव्हा देव आशीर्वाद देतो तेव्हा संपत्ती मिळवणे हे वरदान नसते. देवाची कृपा म्हणजे आंतरिक विचार बदलणे. प्रेमानंद महाराज म्हणाले की, देवाचे नाव घ्या आणि अजिबात काळजी करू नका.
अनुष्का झाली भावनिक
अनुष्का आणि विराटने प्रेमानंद महाराजांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले आणि यावेळी खूप भावनिक झाले. अनुष्का शर्मा आपले अश्रूही रोखू शकली नाही. यावेळी अनुष्का शर्मा काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या सूटमध्ये दिसली. अनुष्का शर्मा मेकअपशिवाय दिसली. विराट कोहली देखील शर्ट आणि पॅण्टमध्ये पाहायला मिळाला.
अनुष्का सिनेइंडस्ट्रीपासून आहे दूर
अनुष्का शर्माने ११ डिसेंबर २०१७ रोजी विराट कोहलीशी लग्न केले. त्यांचे लग्न एका खाजगी समारंभात झाले. त्यांना दोन मुले आहेत. मुलगी वामिका आणि मुलगा अकाय. अनुष्का गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीपासून दूर आहे. शेवटची ती २०१८ मध्ये 'झिरो' चित्रपटात दिसली होती. तेव्हापासून ती कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. ती 'चकदा एक्सप्रेस' चित्रपटात दिसणार होती, परंतु तो चित्रपटही रखडल्याचे समजते आहे.