पत्रकार होण्याचे स्वप्न, पण बनली अभिनेत्री! क्रिकेटपटूसोबत थाटला संसार, कोण आहे ही अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2024 10:18 IST2024-05-01T10:17:39+5:302024-05-01T10:18:26+5:30

क्रिकेट आणि बॉलिवूडचे लव्ह कनेक्शन जुने आहे.

Anushka Sharma Birthday She Wants To Become Journalist Wedds Virat Kohali | पत्रकार होण्याचे स्वप्न, पण बनली अभिनेत्री! क्रिकेटपटूसोबत थाटला संसार, कोण आहे ही अभिनेत्री

पत्रकार होण्याचे स्वप्न, पण बनली अभिनेत्री! क्रिकेटपटूसोबत थाटला संसार, कोण आहे ही अभिनेत्री

क्रिकेट आणि बॉलिवूडचे लव्ह कनेक्शन जुने आहे. क्रिकेटपटू आणि बॉलिवूडमधल्या अभिनेत्री यांच्या जोड्या केवळ ब्रँड एंडोर्समेंट्स किंवा जाहिरातींमध्येच नव्हे तर वास्तविक जीवनातही प्रचंड हिट ठरल्या आहेत. यातील काही जोडप्यांनी लग्नापर्यंतची पायरीही गाठली. बॉलिवूडमधील सर्वात टॉपची एक अभिनेत्री आहे, जिचं स्वप्न तर पत्रकार होण्याचं होतं. पण, अभिनयात आली आणि थेट क्रिकेटपटूसोबत संसार थाटला. आज या टॉपच्या अभिनेत्रीचा वाढदिवस आहे. 

ही अभिनेत्री म्हणजे अनुष्का शर्मा. आज अनुष्का आपला ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. अनुष्का शर्मा आज बॉलिवूडमधील सर्वात टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. पण, तिला अभिनेत्री व्हायचं नव्हतं. अनुष्काने पत्रकार होण्याचा निर्णय घेतलेला. पण नशिबाने तिला अभिनय क्षेत्राकडे आणले. ती मॉलमध्ये गेली असताना एका दिग्दर्शकाने तिला पाहिले आणि मॉडेलिंगची ऑफर केली. येथूनच अनुष्काच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली.

अनुष्का शर्माने शाहरुख खानच्या 'रब ने बना दी जोडी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमानंतर अनुष्काचे नशीब बदलले आणि अभिनेत्रीसमोर चित्रपटांची रांग लागली. यानंतर अनुष्का शर्माने अनेक हीट चित्रपट दिले.  अभिनयाची जादू दाखवल्यानंतर अनुष्का शर्माने स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस उघडलं आहे.  अभिनेत्रीने 2017 मध्ये भारतीय क्रिकेटर विराट कोहलीसोबत लग्न केले. आज अनुष्का आणि विराट कोहलीला मुलगी वामिका आणि मुलगा अकाय ही दोन मुले आहेत. अनुष्का शर्मा सध्या बॉलिवूडपासून दूर असून मातृत्वाचा आनंद घेत आहे.
 

Web Title: Anushka Sharma Birthday She Wants To Become Journalist Wedds Virat Kohali