​अनुष्का शर्मा अन् विराट कोहलीने केले ५०% सेलमध्ये शॉपिंग; लोकांनी उडवली खिल्ली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2018 13:42 IST2018-01-01T08:12:49+5:302018-01-01T13:42:49+5:30

विराट कोहली व अनुष्का शर्मा हे नवदाम्पत्य सध्या केपटाऊनमध्येआहे. याठिकाणी विराट दक्षिण आफ्रिकेसोबत टेस्ट, वन डे आणि टी20 मॅच ...

Anushka Sharma and Virat Kohli made 50% purchase in cell; People screwed up! | ​अनुष्का शर्मा अन् विराट कोहलीने केले ५०% सेलमध्ये शॉपिंग; लोकांनी उडवली खिल्ली!

​अनुष्का शर्मा अन् विराट कोहलीने केले ५०% सेलमध्ये शॉपिंग; लोकांनी उडवली खिल्ली!

राट कोहली व अनुष्का शर्मा हे नवदाम्पत्य सध्या केपटाऊनमध्येआहे. याठिकाणी विराट दक्षिण आफ्रिकेसोबत टेस्ट, वन डे आणि टी20 मॅच सीरिज खेळणार आहे. विराटसोबत अनुष्काही आहे. म्हणजेच, खेळासोबत आऊटिंग, शॉपिंग असे सगळेच आले. विराट व अनुष्काचा याठिकाणचा शॉपिंग करतानाचा फोटो सध्या व्हायरल होतो आहे. केवळ व्हायरल नाही तर या फोटोवरून विरूष्का सध्या ट्रोल होत आहेत. विराटच्या फॅन क्लबने केलेल्या दाव्यानुसार, हा फोटो केपटाऊनचा आहे.



याठिकाणी विरूष्का शॉपिंग करत आहेत. आता तुम्ही म्हणाल, शॉपिंग करण्यात गैर काय? आमच्यासाठी तसे काहीही गैर नाही. पण काही लोकांनी मात्र विरूष्काच्या या शॉपिंगमध्ये भलतेच काही शोधून काढले आहे. होय, विरूष्का ज्या दुकानात शॉपिंग करत आहेत, त्याठिकाणी ५० टक्के सूट दिली जात आहे.



म्हणजेच. दुकानात सेल लागलाय आणि याठिकाणी विरूष्का शॉपिंग करत आहेत. याचमुळे चाहत्यांनी विरूष्काला टार्गेट केले आहे. ट्रोलर्सनी विरूष्काच्या या शॉपिंग फोटोवर अनेक मजेशीर कमेंट्स दिल्या आहेत. यातील अनेक कमेंट्स वाचून तुम्ही पोट धरून हसाल, यात शंका नाही.




ALSO READ : ​ सासरी पोहोचली अनुष्का शर्मा...देसी लूकमधील फोटो व्हायरल!

विराट व अनुष्का अलीकडे ११ डिसेंबला लग्नबंधनात अडकलेत. विराट आणि अनुष्का या दोघांमध्ये २०१३ पासून अफेअर सुरु होते. एका कमर्शिअलच्या शूटवेळी दोघांचीही भेट झाली होते. अर्थात २०१५ च्या सुरुवातीला दोघांचेही ब्रेकअप झाल्याची बातमी आली होती. मात्र यानंतर मार्च २०१६ मध्ये दोघेही एकत्र दिसले आणि यांच्या प्रेमाच्या चर्चा पुन्हा होऊ लागल्या. गत वर्षी दोघांनीही डेहराडून येथे नाताळ साजरा केला होता. युवराज सिंह व हेजल किच हे दोघे त्यांचे खास अतिथी होते. यावर्षी मे महिन्यात जहिर खान व सागरिका घाटगे यांच्या साखरपुड्याला दोघेही लव्हबर्ड्स एकत्र पोहोचले होते. 
 
 

Web Title: Anushka Sharma and Virat Kohli made 50% purchase in cell; People screwed up!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.