लग्नाआधी अनुष्का शर्माने विराटचं नावच बदललेलं? काय आहे तो किस्सा वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 16:11 IST2025-05-01T16:10:12+5:302025-05-01T16:11:01+5:30
विराट अनुष्काची लग्नाआधीच अफेअरची खूप चर्चा होती. त्यांचं लग्न इतकं गुपित ठेवण्यात आलं होतं की कोणाला कानोकान खबरही नव्हती.

लग्नाआधी अनुष्का शर्माने विराटचं नावच बदललेलं? काय आहे तो किस्सा वाचा
अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आज ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. अनुष्का आणि विराट या जोडीचा तर मोठा चाहता वर्ग आहे. २०१७ मध्ये दोघांनी इटलीत लग्नगाठ बांधली. नंतर अनुष्का फार कमी सिनेमांमध्ये दिसली आहे. विराट अनुष्काची लग्नाआधीच अफेअरची खूप चर्चा होती. त्यांचं लग्न इतकं गुपित ठेवण्यात आलं होतं की कोणाला कानोकान खबरही नव्हती. याचाच एक किस्सा अनुष्काने मुलाखतीत सांगितला होता.
अनुष्का शर्मा वोग मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत म्हणालेली की, "आम्हाला आमचं लग्न गुपित ठेवायचं होतं. आम्ही आमच्या केटररलाही लग्न होणाऱ्या मुलाचं नाव खोटं सांगितलं होतं. मी विराटचं नाव राहुल असं सांगितलं होतं." आज अनुष्काच्या वाढदिवशी विराटने छान पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
अनुष्का आणि विराट आज पॉवर कपल म्हणून ओळखलं जातं. २०१३ साली एका जाहिरातातीत काम करताना त्यांची भेट झाली होती. विराटने पहिल्याच भेटीत तिच्यावर जोक केला होता. त्यामुळे अनुष्काला तो थोडा विचित्र वाटला होता. मात्र नंतर त्यांची ओळख होत गेली. ते मित्र झाले आणि नंतर प्रेमात पडले. अनुष्का सिनेमांमध्ये व्यस्त होती तर विराट क्रिकेटमध्ये एकावर एक विक्रम रचत होता. २०१७ साली त्यांनी लग्न केलं. नंतर अनुष्काने करिअर बाजूला ठेवत संसाराकडे लक्ष द्यायचं ठरवलं. २०२१ मध्ये अनुष्काने मुलीला जन्म दिला. तिचं नाव 'वामिका' असं ठेवण्यात आलं. तर गेल्या वर्षी अनुष्काला मुलगा झाला. त्याचं नाव 'अकाय' आहे. अनुष्काच्या सिनेमातील कमबॅकसाठी तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.