अनुष्का शर्मा आणि प्रियांका चोप्रामध्ये या अभिनेत्यावरुन झालेले वाद, कोण आहे हा अभिनेता?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 16:08 IST2025-09-13T16:07:48+5:302025-09-13T16:08:34+5:30
२०१५ साली एक मल्टीस्टारर चित्रपट आला होता, ज्यात एक नाही तर अनेक स्टार होते. हा चित्रपट बॉक्स-ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला होता आणि समीक्षकांनीही त्याचे खूप कौतुक केले होते. या चित्रपटाच्या सेटवर दोन आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये वाद झाला होता. त्या दोघींच्या भांडणाचे कारण एक अभिनेता होता.

अनुष्का शर्मा आणि प्रियांका चोप्रामध्ये या अभिनेत्यावरुन झालेले वाद, कोण आहे हा अभिनेता?
बॉलिवूड चित्रपटांच्या सेटवर दोन अभिनेत्रींमधील भांडण ही सामान्य गोष्ट होती. नव्वदच्या दशकात चित्रपट निर्माते एकाच वेळी दोन अभिनेत्रींना कास्ट करण्यापूर्वी विचार करत होते, कारण एकाच वेळी दोन अभिनेत्रींसोबत काम करणे त्यांच्यासाठी कमी जोखमीचे नव्हते. मात्र आता गोष्टी खूप बदलल्या आहेत, पण २०१५ मध्ये अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) अभिनीत 'दिल धडकने दो' (Dil Dhadakne Do Movie) हा चित्रपट आला होता, ज्यात दोन्ही अभिनेत्रींनी दमदार भूमिका साकारल्या होत्या. पण तुम्हाला माहीत आहे का, या चित्रपटाच्या सेटवर दोघींमध्ये वाद झाला होता.
'दिल धडकने दो'च्या सेटवर प्रियांका चोप्रा आणि अनुष्का शर्मा यांच्यात एका अभिनेत्यामुळे वाद झाला होता आणि हा अभिनेता म्हणजे दर्शन कुमार. अनुष्काने तिच्या 'एनएच १०' या चित्रपटात अभिनेत्यासोबत काम केले होते. त्याच वेळी, प्रियांकाने त्याच्यासोबत 'मेरी कोम'मध्ये काम केले होते. अनुष्काला दर्शन कुमार खूप उद्धट वाटला होता, पण प्रियांकाचे मत होते की तो खूप चांगल्या स्वभावाचा माणूस आहे आणि मग काय, 'दिल धड़कने दो'च्या वेळी दोघींमध्ये वाद झाला.
दर्शन कुमारमुळे अनुष्का-प्रियांकामध्ये झालेला वाद
नुकत्याच एका मुलाखतीत, दर्शन कुमारने याबद्दल खुलासा केला आणि 'बॉलिवूड बबल'ला सांगितले, ''अनुष्का शर्मा आणि प्रियांका चोप्रा त्यांच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान भेटल्या आणि माझ्याबद्दल बोलल्या. प्रियांका म्हणाली की दर्शन एक चांगला, मेहनती आणि उत्तम अभिनेता आहे. अनुष्का म्हणाली, ‘कुठे?’ मी त्याच्यापेक्षा उद्धट माणूस कधीच पाहिला नाही. त्या दोघी माझ्यावरुन भांडल्या. त्यावेळी मी माझ्या भूमिकेत होतो. मी त्या वेळी सतबीर होतो, मी अनुष्काला कधीच नमस्कार केला नाही. मी क्लाइमॅक्सनंतरच तिला भेटलो.''
अभिनेत्याने अनुष्काची केलेली मस्करी
तो पुढे म्हणाला, ''हा माझ्या अभिनयाच्या प्रक्रियेचा भाग होता. तिला काहीच कल्पना नव्हती. तिला वाटले की माझा स्वभावच असा आहे, कदाचित तिने तसा विचार केला. तिने मस्करीत कुणालातरी सांगितले की, 'क्लायमॅक्समध्ये याला चांगल्याने रॉडने मारेन.' नंतर मी तिला चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिल्लीत भेटलो. तिचे मन बदलले आणि तिला वाटले की मी खूप चांगला माणूस आहे. मी तिला सांगितले की त्या वेळी मी माझ्या भूमिकेत होतो.''